जिल्ह्यात ८५३ रुग्णांची तर, १५ जणांच्या मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 08:44 PM2020-10-28T20:44:21+5:302020-10-28T20:44:36+5:30
CoronaVirus: ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत २१९ बाधितांची तर, ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४५ हजार ९४९ तर, मृतांची संख्या ११४१ वर गेली आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारी ८५३ कोरोना रुग्णांसह १५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २ लाख ९ हजार १३८ तर, मृतांची संख्या आता ५ हजार २७६ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत २१९ बाधितांची तर, ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४५ हजार ९४९ तर, मृतांची संख्या ११४१ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १८१ रुग्णांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. कल्याण डोंबिवलीत १९७ रुग्णांसह १ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये ६६ रुग्णांची तर, ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात १३ बधीतांची तर, १ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात झाली. तसेच उल्हासनगर २३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथमध्ये ३३ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, बदलापूरमध्ये ४८ रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात ७३ रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १६ हजार ६४७ तर, मृतांची संख्या ५१६ वर गेली आहे.