नवी दिल्ली : ठाणे जिल्ह्याला ७५ वर्षांत पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळाले, ही बाब मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली तेव्हा त्यांनी माझी पाठ थोपटत अनेकांना याबाबत सांगितले. आगरी समाजात याआधी कोणीही मंत्री झाला नव्हता. या समुदायाचा वापर सातत्याने केवळ मतांसाठी करून घेण्यात आला, अशा भावना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केल्या.लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी राज्यमंत्री कपिल पाटील यांची येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटील म्हणाले की, माझ्याकडच्या पंचायत राज खात्यामध्ये काम करण्यासारखे खूप आहे. मंत्री झाल्यानंतर मी खात्याचा अभ्यास करीत आहे. दोन दिवसांनंतर मी महाराष्ट्रात जाणार आहे. अलिबाग, रायगड येथे ५०० कि.मी.ची सन्मान यात्रा काढणार आहे. त्यानंतर उत्तर पूर्व भागाचा दौरा करणार असून, येथील ग्रामपंचायतींचा विकास कसा करता येईल याचे नियोजन करणार आहे.
७५ वर्षांत पहिल्यांदा मिळाले ठाण्याला केंद्रीय मंत्रीपद; ग्रामपंचायतींच्या विकासावर भर - कपिल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 9:59 AM