ठाणे - ठाण्याचे भुषण असलेले जनकवी कै. पी. सावळाराम यांच्या स्मृती समारोह ठाणे महापालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित करण्यात येतो. या निमित्त जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार, गंगा जमुना पुरस्कार व ठाणे महापालिका क्षेत्रातील शैक्षणिक, साहित्य व कला क्षेत्रातील उद्योन्मुख कलाकारांचा पुरस्कार देऊन सत्कार केला जातो. परंतु आता देण्यात येणाºया पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे.या संदर्भातील पुरस्कार नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. त्यानुसार यापूर्वी जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराचे स्वरुप रक्कम - २५ हजार, शाल आणि स्मृती चिन्ह असे होते. आता या पुरस्काराची रक्कम ५१ हजार, गंगा - जमुना पुरस्काराची रक्कम देखील २१ हजारावरुन ५१ हजार आणि महापालिका क्षेत्रातील शैक्षणिक, साहित्य व कला क्षेत्रातील तीन उद्योन्मुख कलाकारांसाठी ११ हजार ही पुरस्काराची रक्कम होती. ती आता २१ हजार करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेने केली पी. सावळाराम स्मृती पुरस्कारांच्या रकमेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:38 PM
ठाणे महापालिकेने जनकवी कै. पी. सावळाराम स्मृती समारोह पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे.
ठळक मुद्देतीनही पुरस्कारांच्या रकमेत करण्यात आली वाढनुकत्याच झालेल्या महासभेत प्रस्ताव झाला मंजुर