ठाणे : आपल्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रार करणा-या महाजन प्रजापती या शिक्षकावर खुनी हल्ला करणारा सावरकर नगरातील ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा मुख्याध्यापक रमेश मिश्रा आणि त्याचा मुलगा आशिष या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी रात्री अखेर अटक केली. त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. गेली अनेक दिवस तो पोलिसांना हुलकावणी देत होता.मिश्राने दहा हजारांची सुपारी देऊन प्रजापतींवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी रोशन सिंग (२०), विशाल मोरे (१९), प्रकाश चाळके (२०) आणि विक्रांत सोनवणे या चौघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, उपनिरीक्षक सचिन आंब्रे यांच्या पथकाने यापूर्वीच अटक केली होती. मिश्रा याने ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला घडवून आणला होता. त्यावेळी प्रजापती यांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ज्ञानोदय विद्यालयात कनिष्ठ शिक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या प्रजापती यांनी मिश्राविरुद्ध शाळेतील गैरव्यवहाराबाबत शिक्षण विभागासह अन्य खात्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मिश्रा हे नऊ वर्षांपासून शाळेत एकही दिवस हजर न राहता केवळ मस्टरवर सह्या करून वेतन घेत असल्याची प्रजापती यांच्यासह अन्य शिक्षकांचीही तक्रार होती. ३ डिसेंबर रोजी रात्री प्रजापती जेवण झाल्यानंतर सावरकरनगरातील पानाच्या दुकानावर गेले होते. त्याचवेळी चौघांनी त्यांच्यावर तलवार आणि लोखंडी रॉडने खूनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी मिश्राही तिथे होते. शिक्षकावर खूनी हल्ला करण-या रोशन सिंग याच्यासह चौघांना ९ ते १५ डिसेंबर २०१७ दरम्यान पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुख्याध्यापक मिश्रा मात्र पसार झाला होता. ठाणे न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमवारी रात्री मिश्रा पोलिसांना शरण आला. त्याच्यासह त्याचा मुलगा आशिष यालाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती गिरधर यांनी दिली.
शिक्षकाच्या खुनाची सुपारी देणा-या मुख्याध्यापकाला अखेर ठाणे पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:06 PM
आपल्याच सहकारी शिक्षकाला दहा हजारांमध्ये ठार मारण्याची सुपारी देणा-या मुख्याध्यापक आणि त्याच्या मुलाला ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अखेर दिड महिन्यांनी अटक केली आहे.
ठळक मुद्देगेल्या दिड महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी न्यायालयानेही फेटाळला अटकपूर्व जामीनयापूर्वी पोलिसांनी केली चौघांना अटक