ठाणे पोलिसांनी थकविले टीएमटीचे ८ कोटी १९ लाख

By admin | Published: March 2, 2016 01:51 AM2016-03-02T01:51:07+5:302016-03-02T01:51:07+5:30

आधीच तोट्यात असलेल्या ठाणे परिवहन सेवेला विविध समस्यांच्या गर्तेतून जात असतांनाच आता ठाणे पोलिसांनीदेखील परिवहनचे आठ वर्षांचे ८ कोटी १९ लाख थकविल्याची बाब समोर आली

Thane Police exhausted TTT of 8 crore 19 lakh | ठाणे पोलिसांनी थकविले टीएमटीचे ८ कोटी १९ लाख

ठाणे पोलिसांनी थकविले टीएमटीचे ८ कोटी १९ लाख

Next

ठाणे : आधीच तोट्यात असलेल्या ठाणे परिवहन सेवेला विविध समस्यांच्या गर्तेतून जात असतांनाच आता ठाणे पोलिसांनीदेखील परिवहनचे आठ वर्षांचे ८ कोटी १९ लाख थकविल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात परिवहनने वारंवार पाठपुरावा करुनदेखील पोलिसांनी अद्यापही ही थकबाकी भरली नसल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली.
ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या अंदाजपत्रकात ही बाब नमूद केली आहे. ठाणे परिवहन सेवेत आजघडीला ३१३ बस असून त्यातील १८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. परिवहनचे प्रवासी इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबर खाजगी बसने पळविल्याने परिवहनचे दररोजचे उत्पन्न सुद्धा २६ लाखांवरून २३ लाखांवर आले आहे. त्यात वेतन थकबाकी मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी आधी उत्पन्न वाढवा मगच तुमच्या मागणीचा
विचार केला जाईल, असा सल्ला दिला आहे.
परंतु, दुसरीकडे परिवहनला विविध बाबींकडून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ठाणे पोलिसांच्या थकबाकीचादेखील समावेश होतो. पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रवास खर्चापोटी पोलीस ग्रॅन्ट परिवहन सेवेकडे प्राप्त होत असते. २००७-०८ ते २०१५-१६ या कालावधीत ती ८ कोटी १९ लाख एवढी असून गृह खात्याकडून अद्याप ती प्राप्तच झाली नसल्याचे परिवहनने अंदाजपत्रकात नमूद केले आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मिळावी म्हणून परिवहन सेवेने गृह खात्याकडे वारंवांर पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. परंतु अद्यापही त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नसल्याची माहिती परिवहन सूत्रांनी दिली. परंतु मार्च २०१६ पर्यंत या रकमेपैकी ५ कोटी ८१ लाख व २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ कोटी ३८ लाख परिवहन सेवेकडे प्राप्त होतील, असे अपेक्षित धरले आहे. मागील वर्षीदेखील ही रक्कम मिळेल, अशी अपेक्षा परिवहनला होती, परंतु ती अद्यापही मिळालेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Thane Police exhausted TTT of 8 crore 19 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.