हरियाणा येथील राष्ट्रीय बेंच प्रेस पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ठाण्याच्या दाभोळकरांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 09:10 PM2018-02-02T21:10:49+5:302018-02-02T21:19:07+5:30
सोनिपत (हरियाणा) येथे झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्यातील संजय दाभोळकर यांनी बाजी मारली असून १२० किलोचे वजन उचलून त्यांनी सुवर्णपदक पटकविले आहे.
ठाणे: येथील सुपरमॅक्स कंपनीतील कामगार संजय दाभोळकर (रा. बदलापूर, जि. ठाणे) यांनी हरियाणा येथे झालेल्या निमंत्रित राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत १२० किलोचे बेंच प्रेस उचलून सुवर्णपदक मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कंपनी व्यवस्थापनातर्फे शुक्रवारी ठाण्यत सत्कार करण्यात आला.
सोनिपत दिल्ली रोड (हरियाणा) येथे २८ जानेवारी रोजी पार पडलेल्या निमंत्रित बेंच प्रेस पॉवरलिफ्टींग चॅम्पियन शोध सिनियर मास्टर पुरुष आणि महिला अशा वेगवेगळया गटामध्ये या स्पर्धा हॉटेल कोझिट कॅझिनीट येथे पार पडल्या. या या स्पर्धांमध्ये हरियाणा, दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब अशा वेगवेगळया राज्यातून १६० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात दाभोळकर यांनी मास्टर -२ या ५० वर्षांवरील स्पर्धेत १२० किलोचे बेंचप्रेस करुन सुवर्णपदक पटकविले. दुसरा क्रमांक कर्नाटक तर तिसरा क्रमांक सोनिपतच्या स्पर्धकाने मिळविला.
गेल्या वर्षभरात दाभोळकर यांनी राष्टÑीय तसेच आंतरराष्टÑीय बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्टÑाला अनेक सुवर्णपदक मिळवून दिले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे प्लान्ट व्यवस्थापक उदय देसाई तसेच कामगार संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते आदींनी त्यांचा विशेष सत्कार केला.