मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गहाळ झालेले २६ मोबाईल सायबर शाखेने मोबाईल धारक नागरिकांना शुक्रवारी परत केले.
मोबाईल गहाळ होणे , चोरीला जाणे असे प्रकार सातत्याने घडत असतात . सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर अर्थात केंद्राच्या सीईआयआर पोर्टल वर मोबाईल गहाळ झाल्याची नोंद नागरिक करत असतात . पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अश्या मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारींवरून गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखेचे निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ , उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर सह संतोष चव्हाण , प्रवीण आव्हाड , गणेश इलग , कृष्णा सावळे , प्रशांत बोरकर , प्रवीण सावंत , राजेश भरकडे , विजय खोत , आकाश बोरसे व सोनाली मोरे यांच्या पथकाने तपास चालवला होता.
तपासात पोलिसांनी सुमारे ४ लाख किमतीचे २६ मोबाईल हस्तगत केले . या २६ मोबाईलचे वाटप त्यांच्या मूळ मालकांना उपायुक्त अंबुरे यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त कार्यालयात