...तर डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली छोटी राज्ये निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:42 PM2018-02-12T12:42:26+5:302018-02-12T12:43:29+5:30

... then Dr. To create small states that are meant for Babasaheb | ...तर डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली छोटी राज्ये निर्माण करणार

ambedkar

Next
ठळक मुद्देबसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचे प्रतिपादन

कल्याण: देशाच्या विकासासाठी छोटया छोटया राज्यांची निर्मिती झाली पाहीजे अशी संकल्पना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर आम्ही विदर्भ, मराठवाडासह कोकण आणि खानदेश अशा चार छोटया राज्यांची निर्मिती करू असे प्रतिपादन बसपा नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश साखरे यांनी रविवारी कल्याणात केले.
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत रोहीदास महाराज, गाडगे महाराज आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून कल्याणमधील गिरीजा सभागृहात बसपाच्या वतीने कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे संमेलन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून साखरे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर प्रदेश महाप्रभारी प्रा. नामदेव खंदारे, महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव दयानंद किरतकर, सुनिल खांबे आणि अशोक सिंग आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साखरे पुढे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजप सरकार हे पुरते अपयशी ठरले आहे. सत्तेत येण्याआधी विदर्भ वेगळा करण्याची भाषा करणारी भाजपा सत्तेत आल्यावर गप्प का? असा सवाल त्यांनी केला. राज्यात शेतकरी कर्जबाजरी झाल्याने आत्महत्या करत असताना आता मंत्रालयातही आत्महत्या होताना दिसतात. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण केलेली नाहीत. देशात भ्रष्टाचार होत असल्याचे कारण पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी नोटबंदी केली. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला मात्र भाजपाच्या नेत्यांवर नोटाबंदीचा काहीही परिमाण झाला नाही. भारत देशात सर्वात जास्त जीएसटी लागू केली आहे. नोटाबंदी ते जीएसटी या काळात महाराष्ट्रात खूप उद्योगधंदे बंद पडल्याने परिणामी बेरोजगारी वाढली. म्हणून हे सरकार पुर्णत: अपयशी ठरल्याचे साखरे म्हणाले. भाजप सरकार खोटे बोलते. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला ४ वर्षे झाली मात्र अद्याप नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रु पये जमा झाले नसल्याकडे साखरे यांनी लक्ष वेधले. आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात जिल्हानिहाय कार्यकर्ता मेळावा घेत असतो. आमचे संघटन विधानसभा क्षेत्रात मजबूत झाले आहे. महाराष्ट्रात भाईचारा कमीटी स्थापन करून सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही राज्यात काम करणार आहोत. तसेच राज्यात ओबीसी मेळावे आणि परिषदा घेणार आहोत असेही साखरे म्हणाले. तर नविनर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचे संघटन कौशल्य फार चांगले असल्याने आता आमचा विश्वास वाढला आहे. येणा-या निवडणुकीत बहुजन पार्टीचे विधानसभेत आणी लोकसभेत मोठया संख्येने सदस्य असतील असा विश्वास प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी व्यक्त केला.
 

Web Title: ... then Dr. To create small states that are meant for Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.