महिलांच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करणारा चोरटा अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 06:45 PM2021-03-03T18:45:43+5:302021-03-03T18:48:13+5:30
कळवा परिसरात पायी जाणाºया महिलांच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करणाºया मोहम्मद हसन असगर अली शेख (२३, रा. कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा परिसरात पायी जाणाºया महिलांच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करणाºया मोहम्मद हसन असगर अली शेख (२३, रा. कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील ३३ हजारांचे तीन मोबाईल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कळवा पूर्व भागातील इंदिरानगर येथील रहिवाशी रुपाली शिंदे (३३) ही महिला २६ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कळवा पूर्व रेल्वे स्थानक येथून तिच्या घरी जाण्यासाठी मफतलाल तलावासमोरील सार्वजनिक रस्त्यावरुन पायी जात होती. त्याचवेळी एका अनोळखी भामटयाने तिची मान पकडून तिच्या हातातील सात हजारांच्या मोबाईल फोनची जबरीने चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी तिने कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, हवालदार शहाजी एडके, माधव दराडे, रमेश पाटील, पोलीस नाईक संदीप महाडीक, रवींद्र बिºहाडे, संतोष ठेबे आणि विकास साठे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कळवा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून १ मार्च रोजी मोहम्मद हसन याला अटक केली.
सखोल चौकशीमध्ये संचिता कदम (२५, रा. खारेगाव, ठाणे) यांचा १८ हजारांचा मोबाईल २७ फेब्रुवारी रोजी जबरीने चोरल्याची तसेच मालती सोरटे (१८, रा. इंदिरानगर, कळवा) हिचाही आठ हजारांचा मोबाईल त्याने २५ फेब्रुवारी रोजी चोरल्याची कबूली दिली. त्याच्याकडून हे तिन्ही मोबाईल जप्त केले आहेत. त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.