उल्हासनगर / टिटवाळा : उल्हासनगरातील शासकीय प्रसूती रुग्णालयातील पाच कर्मचारी रविवारी सहलीसाठी खडवली येथील भातसा नदीकिनारी गेले. तेथील नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच पैकी तिघांचा बुडून मुत्यू झाला. तर दोन जण सुखरूप बचावले आहेत.कॅम्प नं.-४ येथे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयात वरिष्ठ लिपिक कैलास बच्चाव, कनिष्ठ लिपिक राजेंद्र तायडे, शिपाई धर्मवीर पाटील तर कंत्राटीपद्धतीवर काम करणारे संगणक आॅपरेटर विक्रांत नेमाडे व सचिन पोळ असे पाच जण रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी खडवली येथे गेले होते. दुपारी ते भातसा नदी पात्रात पोहण्यास उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने पाटील, तायडे व नेमाडे हे बुडाले. तर नदीकिनारी असलेले बच्चाव व पोळ वाचले.
खडवलीच्या भातसा नदीत तिघे बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:34 AM