लोकलमधून पडून तिघे जखमी; तरुणीसह दोन तरुणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:58 AM2019-12-19T05:58:47+5:302019-12-19T05:58:57+5:30

उल्हासनगरच्या घटना

Three injured fall from local; Two youths, including a young woman | लोकलमधून पडून तिघे जखमी; तरुणीसह दोन तरुणांचा समावेश

लोकलमधून पडून तिघे जखमी; तरुणीसह दोन तरुणांचा समावेश

Next

उल्हासनगर : उल्हासनगर व विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकांवर लोकलमधून पडून दोन तरु ण व एक तरु णी गंभीर जखमी झाल्याच्या तीन घटना मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी घडल्या. त्यापैकी जखमी तरुणीला सायन येथे, तर दोन तरुणांना ठाणे आणि मुंबई
येथे उपचारासाठी हलवले आहे.


शहरातील विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकापासून जवळ असलेल्या एफ केबिन वालधुनीजवळ मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक
तरु णी अंबरनाथ लोकलमधून पडली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उचलून नेण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकावर कोणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे जखमी मुलगी तिथेच विव्हळत पडली होती.


जखमी मुलीचे नाव कळू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरी घटना उल्हासनगर रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री १० वाजता घडली. मुंबईकडे जाणाऱ्या कसारा लोकलमधून उल्हासनगर येथील दिनेश गायकवाड नावाचा मुलगा पडून गंभीर जखमी झाला. तिसरी घटना बुधवारी दुपारी घडली. उल्हासनगर येथील डिसोल्व्हा सिमोन डॉमनिक हा महाविद्यालयीत तरुण उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडला.

लोकलमधील गर्दी रोखणे अशक्य
मुंबईतील लोकलची गर्दी ही नेहमीचीच. लोकसंख्या वाढतेय, शहरात लोंढेच्या लोढें वाढत आहेत. याचा परिणाम लोकलच्या गर्दीवर. दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी मात्र प्रचंड वाढत चालली आहे. यातूनच दररोज या गदीर्ने बळी जातात. लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीमुळे या दुर्घटना होत असल्याचे सांगून चाकरमान्यांनी लोकलफेºया वाढवण्याची मागणी केली. लोकल आणि वाढती गर्दी यावर नियंत्रण ठेवण्याचे काम नेमके कोणाचे आहे, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.

Web Title: Three injured fall from local; Two youths, including a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल