ठाणे जिल्ह्यातील छायाचित्र नसलेले तीन लाख मतदार बाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:41 PM2021-09-20T21:41:12+5:302021-09-20T21:41:47+5:30

voters list: ठाणे  जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये  छायाचित्र नसलेले दोन लाख 92 हजार 239 नावे मतदार यादीतून कायमचे गवळून त्यांना बाद केले आहे.

Three lakh voters without photographs in Thane district excluded | ठाणे जिल्ह्यातील छायाचित्र नसलेले तीन लाख मतदार बाद

ठाणे जिल्ह्यातील छायाचित्र नसलेले तीन लाख मतदार बाद

Next

ठाणे -  जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये  छायाचित्र नसलेले दोन लाख 92 हजार 239 नावे मतदार यादीतून कायमचे गवळून त्यांना बाद केले आहे.तर 17 हजार 325 मतदारांचे छायाचित्र प्राप्त केले जात आहे. उर्वरित पाच लाख 8 हजार 462 मतदार छायाचित्र  मिळवण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे, अशी माहिती ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना दिली. मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी देशपांडे यांनी ही ऑनलाइन झाडाझडती सोमवारी घेतली. (Three lakh voters without photographs in Thane district excluded)

 मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राज्यात सुरू आहे. त्यास अनुसरून देशपांडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे अन्य जिल्ह्यांसह ठाण्याचा आढावा घेतला. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी ‘मोहीम’ स्वरूपाच्या कामाच निर्देशही देशपांडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. मतदारांचे छायाचित्र उपलब्ध करून घेणो, दुबार किंवा समान नोंदी कमी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. या दरम्यान या दुरदृष्यप्रणाली आढावा बैठकीनंतर जिल्हाधिका:यांनी जिल्ह्यातील 18 मतदार संघातील नोंदणी अधिका:यांची बैठकही सायंकाळी घेतली. यावेळी जिल्हा उप निवडणूक अधिकारी अर्चना कदम, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.

 जिल्ह्यात आगामी नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर आदी महापालिकांच्या निवडणुकांसाठी या मतदार याद्या उपयुक्त ठरणार आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिका:यांनी राजकीय पक्षांच्या बैठका घ्याव्यात, निदरेष मतदार यादीच्या कामाला गती द्यावी,अशी तंबी देत आवश्यकता भासल्यास अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिका:यांची नियुक्तीच्या सूचनाही जिल्हाधिका:यांनी नोंदणी अधिका:यांना यावेळी दिल्या.1 नोव्हेबरपासुन 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्र म सुरु  होणार आहे. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण  आणि प्रमाणीकरणसाठी 5 ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मतदारांनी यादीतील आपले नाव, छायाचित्र 30 सप्टेंबर पूर्वी तपासणी करून घ्यावीत,असेही जिल्हाधिका:यांनी यावेळी मतदारांना आवाहन केले आहे.  

Web Title: Three lakh voters without photographs in Thane district excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.