उल्हासनगर : उल्हासनगरात आज नवे १७४ कोरोना रुग्ण आढळून आली असून एकूण रुग्णाची संख्या २१५६ झाली. तर दोन रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत ११७१ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर ९३५ जनावर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर यांनी दिली आहे.
उल्हासनगरात गुरवारी तब्बल १७४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या २१५६ झाली. त्यापैकी आज पर्यंत ११७१ जण कोरोना मुक्त झाले. तर ९३५ रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन जणाचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ५० झाली.
शहरातील कॅम्प नं -१ मध्ये - ३४, कॅम्प नं-२ मध्ये -३२, कॅम्प नं -३ मध्ये -३७, कॅम्प नं -४ मध्ये -३५ तर कॅम्प नं -५ मध्ये ३६ असे एकूण १७४ नवे रुग्ण आढळून आले. शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत सतत वाढ होत असून शहरातील अनेक विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी २ जुलै गुरवारी सायंकाळी ५ वाजल्या पासून १२ जुलै पर्यंत जनता कर्फ्यू लागू केला. नागरिकांनी कामा शिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.