मुंब्य्रातील खड्डयांमुळे कोपरी आणि कल्याणमध्ये वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:08 AM2021-07-31T00:08:16+5:302021-07-31T00:12:19+5:30

मुंब्य्रातील बाहयवळण मार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या खड्डयांमुळे या मार्गावर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने ठाण्यातील कोपरी तसेच कल्याण परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र शुक्रवारी निर्माण झाले होते.

Traffic jams in Kopri and Kalyan due to potholes in Mumbai | मुंब्य्रातील खड्डयांमुळे कोपरी आणि कल्याणमध्ये वाहतूक कोंडी

मुंब्य्रातील खड्डयांमुळे कोपरी आणि कल्याणमध्ये वाहतूक कोंडी

googlenewsNext
ठळक मुद्दे वाहतूक पोलिसांनी केले नियोजनकोंडी फोडण्यासाठी विशेष पथके

लोकमत न्युज नेटवर्क
ठाणे: मुंब्य्रातील बाहयवळण मार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या खड्डयांमुळे या मार्गावर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने ठाण्यातील कोपरी तसेच कल्याण परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र शुक्रवारी निर्माण झाले होते. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी नेमलेली विशेष पथके तसेच तैनात असलेल्या क्रेन्समुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश आले.
मुंब्रा बायपास मार्गावर पनवेत ते ठाणे आणि ठाणे ते पनवेल या मार्गावर खड्डे पडले आहेत. पनवेल ते ठाणे मार्गावर तर सहा ठिकाणी खड्डे असून एका ठिकाणी पूलाची लोखंडी सळई निखळली आहे. त्यामुळेच नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. मात्र, हलक्या वाहनांना या मार्गावरुन परवानगी देण्यात आली आहे. या काळात हा मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरु केले आहे. ही मुंब्रा येथील वाहतूक महापे ते रबाले, ऐरोली मार्गे पूर्व द्रूतगती मार्गावर वळविण्यात आली आहे. ठाणे शहरात दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ या दरम्यान अवजड वाहनांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळेच याच काळात ठाण्यातील कोपरी भागात तसेच कल्याण मधील काही भागात शुक्रवारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतू, वाहतूक पोलिसांनी एखादे वाहन बंद पडल्यास तिथे दोन जादा क्रेन्स तसेच वाहतूक पोलिसांची कुमक तैनात ठेवली होती. त्यामुळे ही कोंडी फोडण्यात यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
असा आहे बदल....
*वाहतूकीत बदल झाल्याने उरण जेएनपीटीहून गुजरात,भिवंडीकडे जाण्यासाठी ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहतूकीला शिळफाटा येथे प्रवेश बंदी केलेली आहे.
* आता ही मोठी वाहने महापेमार्गे, कापरखैरणे, ऐरोली त्यानंतर आनंदनगर कोपरीपूल येथून ठाणे शहरात येणार आहेत. त्यामुळे याच मार्गावर सध्या वाहतूकीचा भार वाढल्यामुळे ही कोंडी काही प्रमाणात होत आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉड्रन यांना याठिकाणी वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आले आहे.

 

Web Title: Traffic jams in Kopri and Kalyan due to potholes in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.