जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्कठाणो: राज्यातील 26 पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने बुधवारी उशिरा काढले आहेत. यामध्ये ठाण्यातील वाहतूक शाखेचे अमित काळे तसेच भिवंडीचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांचा समावेश आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षाधीन असलेल्या स्मिता पाटील यांची ठाणो ग्रामीणच्या अपर अधीक्षक पदी बदली झाली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील पोलीस उपायुक्त, अधीक्षक आणि अपर अधीक्षक दर्जाच्या अधिका:यांच्या बदल्या रखडलेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच राज्यभरातील काही उपायुक्त तसेच अधीक्षक दर्जाच्या अधिका:यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातील अनेक अधिका:यांना त्यांच्या पसंतीची ठिकाणो मिळत नसल्याने गेली काही दिवस या बदल्यांबाबत राज्य शासनाच्या गृहविभागात तसेच महासंचालक कार्यालयांमध्ये त्याचबरोबर आघाडी सरकारमधील नेत्यांच्या कार्यालयांमध्ये ‘खल-बते’ सुरु होती. अखेर गृहविभागाकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर ठाणो शहर आयुक्तालयातील सात उपायुक्तांच्याही बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात वागळे इस्टेटचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांना आयुक्तालयातच ठाणो शहरमध्ये नियुक्ती मिळाली. त्यांच्या जागी आता मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक विनय राठोड यांची बदली झाली आहे. ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाचे दीपक देवराज यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर अधीक्षक पदी बदली झाली असून त्यांच्या जागी लक्ष्मीकांत पाटील यांना आणण्यात आले आहे. पूर्वी ठाण्याच्या परिमंडळ -5 वागळे इस्टेट येथून बदलून गेलेले (आता प्रतिक्षाधीन) सुनिल लोखंडे यांची ठाणो शहर आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये बदली झाली आहे. मुख्यालय -2 मधील उपायुक्त प्रशांत मोहिते यांना ठाण्यातच उल्हासनगरमध्ये संधी मिळाली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद ग्रामीणचे अपर अधीक्षक गणोश गावडे यांची बदली झाली. ठाणो शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे उपायुक्त काळे यांना जवळच्याच नव्या को:या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 मीरा रोड येथे बदली मिळाली आहे. त्यांच्या जागी अलिकडेच आयपीएस झालेले विशेष शाखेचे बाळासाहेब पाटील यांची तर पीसीआर ठाण्याचे ्रीकृष्णकोकाटे यांची विशेष शाखेत बदली झाली आहे. ठाणो शहरचे सुभाष बुरसे यांची गुप्तवार्ता विभागात, आर्थिक गुन्हे शाखेचे संजय जाधव यांची गृहरक्षक दलाच्या अपर नियंत्रक म्हणून तर भिवंडीचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या (गुप्तवार्ता) अधीक्षकपदी मुंबईत बदली झाली. त्यामुळे योगेश चव्हाण यांची भिवंडीच्या उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.