ठाणे : ठाणे येथील पश्चिमेच्या पाचपाखाडी परिसरात एक भलेमोठे झाड पडले. यामुळे समोरील अमृत सिद्धी सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत व दोन दुकानांचे नुकसान या झाडामुळे काहीसे नुकसान झाले आहे. या झाडांमुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या उटनास्थळी नौपाडा पोलीसांसह ठाणे मनपाच्या आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, तर अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. या झाडांमुळे हा रस्ता काही काळ बंद होता.
ठाणे शहर व तालुक्यात परिसरात 28 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडला आहे. या दरम्यान एक झाड पडण्याच्या घटणेसह एक झाड धोकादायक स्थितीत आहे. तर एका ठिकाणी पाण्याची पाईप लाईन लिकेज झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य आठ किरकोळ घटना घडल्या . जिल्ह्यात 96.50 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडला. ठाणे नंतर भिवंडीत सर्वाधिक 22 मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरी 13.79 मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जिल्ह्यातील धरणांना पावसाची प्रतिक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये दुप्पट पाऊस आजपर्यंत कमी पडला आहे. यामुळे धरणातील पाणी साठा वाढण्याची चिंता लागून आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. श्रावण सरींचा अनुभव मिळवता येत असला तरी जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने ठाणेसह कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यास अनुसरुन ठाणे शहरात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.