डोंबिवली: येथिल सारस्वत कॉलनीत वास्तव्याला असलेले रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मामा लिमये यांचे १० नोव्हेंबर रोजी तर राजाभाऊ बीडकर यांचे देखिल नुकतेच निधन झाले. या दोन्ही नि:स्पृह जीवन जगलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांना रा.स्व.संघ आणि परिवारच्या वतीने बुधवारी संध्याकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी असंख्य स्वयंसेवकांनी त्या दोघांना शब्दसुमानांनी आदरांजली वाहीली, तर अनेकांना आठवणींना उजाळा दिला.पुरुषोत्तम गोविंद लिमये यांचा जीवनपट यावेळी वाचण्यात आला. रेल्वेच्या चोळेगाव - ठाकुर्ली येथिल पॉवर हाऊसमध्ये सीनीअर आॅपरेटर म्हणुन ते सेवानिवृत्त झाले. १९५० च्या दशकात इंजिनियरींगची पदवी घेतलेले मामा आयुष्यभर संघ स्वयंसेवक म्हणुन जगले. अत्यंत साधी राहणी, मितभाषी असा त्यांचा स्वभाव. पण विलक्षण स्मरणशक्ती, दांडगा जनसंपर्क यामुळे मामा जिल्ह्यातील संघ परिवारासह रेल्वे कर्मचा-यांमध्ये सुपरिचित होते. मामा हे नाते दर्शकच असल्याने त्यांच्या अंतकरणात समाजबांधवांप्रती प्रचंड आत्मियता होती, तर त्यांनी सदैव माणुसकी जपली हे देखिल त्यांचे विशेष. तसेच राजाभाऊंचे देखिल होते. या दोघांच्याही आठवणी सांगू तेवढ्या कमी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सारस्वत कॉलनीमधील कानविंदे व्यायाम शाळेत ही सभा संपन्न झाली. संपुर्ण आयुष्य संघासाठी जगलेल्या मामांचे योगदान प्रचंड होते. नि:स्वार्थी व प्रामाणिक पणा ही मामांची प्रतिमा होती. संघकार्यासोबतच भारतीय मजदूर संघ, नाना ढोबळे ग्रंथालय,रेल्वे कामगार संघटना आदी संस्थांमध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. त्यावेळी गंगाधर जोशी, श्रीनिवास जोशी, प्रदिप काळे, अच्युत क-हाडकर, विलास पिंपळखरे, आणि उदय कुलकर्णी आदींनी स्मृतिंना उजाळा दिला. त्यावेळी लिमये, बीडकर कुटूंबियांसह संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक परिवारातील मंडळी, कमलाकर क्षिरसागर, अतुल भावे, चंद्रकांत जोशी, दत्ता रावदेव, गंगाधर पुरंदरे, भाजपचे नगरसेवक संदीप पुराणिक यांच्यासह विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवलीत रा.स्व.संघाच्या दोन स्वयंसेवकांना श्रद्धांजली : मामा लिमयेंसह राजाभाऊ बीडकरांच्या स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:56 PM
सारस्वत कॉलनीत वास्तव्याला असलेले रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मामा लिमये यांचे १० नोव्हेंबर रोजी तर राजाभाऊ बीडकर यांचे देखिल नुकतेच निधन झाले. या दोन्ही नि:स्पृह जीवन जगलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांना रा.स्व.संघ आणि परिवारच्या वतीने बुधवारी संध्याकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी असंख्य स्वयंसेवकांनी त्या दोघांना शब्दसुमानांनी आदरांजली वाहीली, तर अनेकांना आठवणींना उजाळा दिला.
ठळक मुद्दे जेयष्ठ स्वयंसेवकांची उपस्थिती