तुर्फेपाडा तलावाला मिळणार नवसंजीवनी, सात कोटींचा केला जाणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:22 PM2017-11-23T16:22:25+5:302017-11-23T16:26:48+5:30

घोडबंदर भागातील तुर्फेपाडा तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव अखेर मंजुर झाला आहे. त्यानुसार येत्या काळात हा तलाव ठाणेकरांच्या सेवेत हजर होणार आहे.

Turpepada lake will get Navsanjivani, seven crores spent | तुर्फेपाडा तलावाला मिळणार नवसंजीवनी, सात कोटींचा केला जाणार खर्च

तुर्फेपाडा तलावाला मिळणार नवसंजीवनी, सात कोटींचा केला जाणार खर्च

googlenewsNext
ठळक मुद्देतलावाच्या सुशोभिकरणासाठी सात कोटींचा केला जाणार खर्चतीन टप्यात केला जाणार तलावाचा विकास

ठाणे - ठाणे महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीच्या लगीन घाईत घोडबंदर भागातील तुर्फेपाडा तलावाच्या ठिकाणी उद्यान उभारण्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. यासाठी एक कोटींचा खर्च करुन येथे संरक्षक भिंत आणि जॉगींग ट्रॅक उभारण्यात आला होता. परंतु त्यानंतर या उद्यानाची एक विटही पाच वर्षानंतर हलू शकलेली नाही. त्यामुळेच तयार करण्यात आलेल्या जॉगींग ट्रॅक चक्क गायब झाला असून संरक्षक भिंत देखील काही ठिकाणी तोडली गेली होती. त्यामुळे हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आला होता. अखेर ठाणे महापालिकेने या तलवाकडे लक्ष दिले असून या तलावाच्या सुशोभिकरणाचा तब्बल सात कोटींच्या खर्चाचा नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या तलावाला नवसंजीवनी मिळणार आहे.
घोडबंदर भागातील तुर्फे पाडा तलाव हा त्यातीलच एक म्हणावा लागणार आहे. तुर्फेपाडा भागात हा तलाव असून तलावाच्या आजूबाजूला विस्तर्ण अशी जागा आहे. परंतु आज ही जागा मद्यपींचा अड्डा झाला आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा केला जात असून हगणदारीमुक्तीसाठी पालिकेने पावलेही उचलली आहेत. परंतु या भागात तलावाच्या चोहाबाजूने सकाळ, संध्याकाळी शौचास बसलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यात याच तलावात धुणी, भांडी होत असल्याने तलावातील पाणी दुषित होत आहे. त्यातही तलावाच्या आजूबाजूला एवढी झाडी वाढली आहे की, त्यामुळे संपूर्ण तलावाच झाकला गेला आहे.
दरम्यान २०१२ च्या निवडणुकीच्या आधी या तलावाच्या ठिकाणी उद्यान बनविण्याचा घाट घातला गेला. त्यानुसार सत्ताधारी मंडळींच्या नेत्यांनी या उद्यानाच्या कामाचा शुभारंभ देखील केला आणि काम सुरु झाले. पहिल्या टप्यात काम करतांना येथे संरक्षक भिंत आणि जॉगींग ट्रॅक उभारण्यात आले. परंतु या जॉगींग ट्रॅकचा लाभ किती रहिवाशांनी घेतला याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच आहे. आज हा जॉगींग ट्रॅक गायब झाला असून संरक्षक भिंत देखील तोडली गेली असून आता ही जागाच बळकावण्याचा घाट घातला जात असल्याचे दिसत आहे. तलावाच्या आजूबाजूला हगणदारी आणि सांयकाळी मद्यापींचा पडलेला गराडा त्यामुळे हा तलाव असून नसून खोळंबा ठरत आहे.
दरम्यान मधल्या काळात पालिकेने देखील या तलावाचे सुशोभिकरण आणि थीम पार्क विकसित करण्याचा आराखडा तयार केला होता. परंतु यासाठी सुमारे ८.५० कोटींचा निधी अपेक्षित असल्याने एवढा निधी पालिका खर्ची करेल का? असा सवाल उपस्थित होत होता. अखेर स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर पालिकेने या तलावाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात राज्य सरोवर संवर्धन योजने अंतर्गत तलवातील गाळ काढणे, बायो रेमिडीएशन करणे, पाणी नमुन्याची तपासणी, गॅबीयन पध्दतीची ऐज वॉल, वेट लॅन्ड बेजिटेशन, पाथवे, लॅन्डस्केपिंग, कचरा कुंड्या, वर्मी कंपोस्टींग पीट, जनजागृती, फेन्सिंग आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी १ कोटी ८१ लाख २६ हजार ९१६ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामध्ये ७० टक्के खर्च हा शासन आणि ३० टक्के खर्च हा पालिका करणार आहे.
दुसºया टप्यात टो वॉल बांधणे, विद्युत कामे, छोटी मोठी झाडे लावणे, अर्बन रेस्ट रुम तयार करणे, प्रदुषण नियंत्रण संबधींत कामे आदींसाठी ५२ लाख १० हजारांचा खर्च केला जाणार आहे. तिसºया टप्यात पार्क आरक्षणातील भुखंडावर स्टॉर्म वॉटर ड्रेन तयार करणे, अ‍ॅम्पीथिएटर बांधणे, कुंपण भिंत, लॅन्डस्केपींग करणे, उर्वरीत जॉगींग ट्रॅक तयार करणे, उद्यान विकसित करणे, घाट बांधणे, बैठक व्यवस्था, ओपन जीम व लहान मुलांसाठी खेळणी बसविणे, ड्रीप इरिगेशन, थिम पेटींग, बारबेड, दोन कारंजे, आकर्षक रेलिंग, गेट, रॉक म्युरल, विसर्जन तलाव, गझीबो, योगा सेटंर, हास्य क्लब, पाणपोई व अर्बन रेस्ट रुम आदी कामे करण्यात येणार असून यासाठी ५ कोटी ३८ लाख ४०० रुपयांचा खर्च केला जाणार आहे.



 

Web Title: Turpepada lake will get Navsanjivani, seven crores spent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.