लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उपवन येथील एका हाणामारी प्रकरणातील आकाश खेमनार (१९, रा. किसननगर, ठाणे) आणि आशिष देशमुख (२१, रा. शिवाजीनगर, ठाणे) या दोघांना अटक ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.विक्रोळी इंदिरानगर येथील रहिवाशी मोहंमद ओवसे (२२) यांच्यामुळे नोकरी गेल्याच्या रागातून सुशिल आणि प्रदीप काटकर यांचे मित्र आकाश आणि आशिष यांनी त्यांच्या काही साथीदारांच्या मदतीने हॉकी स्टीकने मारहाण करुन त्यांना गंभीर दुखापत केली होती. हा प्रकार २० डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उपवन येथील ‘द देशी ढाबा’ येथे घडला होता. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हाणामारी तसेच दंगल माजविल्याचा गुन्हा पाच जणांविरुद्ध दाखल झाला होता. यातील संशयित आकाश आणि आशिष हे दोघे मुलूंड चेकनाका येथे आले असल्याची माहिती समांतर तपास करणाऱ्या ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय शिंदे, पोलीस हवालदार अंकुश भोसले, प्रशांत बुरके, बाळु मुकणे, उमेश जाधव, चंद्रकांत ठाकरे आणि समीर लाटे आदींच्या पथकाने २६ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास मुलूंड चेकनाका येथून त्यांना ताब्यात घेतले. या दोघांनाही वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपवन येथील हाणामारी प्रकरणातील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 11:58 PM
उपवन येथील एका हाणामारी प्रकरणातील आकाश खेमनार आणि आशिष देशमुख या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी रात्री अटक केली. या दोघांनाही वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा