ठाणे : बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील आणखी दोन आरोपींची न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची रविवारीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून तो १० ते १२ हजार रुपयांमध्ये विकणाºया टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने मागील महिन्यात केला. याप्रकरणी रजनी पंडित आणि काही खासगी गुप्तहेरांसह ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आरोपींमध्ये जुना पनवेल येथील प्रशांत अनंत सोनवणे (३४) आणि संतोष विलास पंडागळे (३४) यांचाही समावेश आहे. दोन्ही आरोपींची खासगी गुप्तचर संस्था असून त्यांनी या प्रकरणातील कोपरखैरणे येथील आरोपी प्रशांत श्रीपाद पालेकर (४९) याच्याजवळून बेकायदेशीर मार्गाने सीडीआर मिळवल्याचा आरोप आहे. पालेकरकडून मिळवलेले सीडीआर दोन्ही आरोपींनी त्यांच्या ग्राहकांना विकल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपींकडून पोलिसांनी जवळपास एक हजार सीडी, लॅपटॉप, संगणक, मोबाइल फोन आदी साहित्य हस्तगत केले. या तपासणीतून आणखी आरोपींची नावे समोर येतील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला.पंडित यांच्याकर्मचाºयांची चौकशीरजनी पंडित यांच्या गुप्तचर संस्थेमध्ये नोकरी करणाºया दोन कर्मचाºयांची तपास अधिकाºयांनी चौकशी केली. या चौकशीचा तपशील पोलिसांनी दिला नसला तरी, तूर्तास त्यांच्याकडून आक्षेपार्ह माहिती समोर आली नसल्याचे तपास अधिकाºयांनी सांगितले.
आणखी दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत; आरोपींकडून तब्बल १ हजार सीडी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:33 AM