मुंब्य्रातील दोघांची कोरोनावर मात तर मुख्यालयातील एकासह चौघांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:01 PM2020-05-11T23:01:09+5:302020-05-11T23:06:16+5:30

एकीकडे मुंब्रा पोलीस ठाण्यातील दोघे पोलीस कोरोनामुक्त झाले असतांनाच त्याच पोलीस ठाण्यातील एका महिलेसह दोघे, मुख्यालयातील एक आणि नौपाडा पोलीस ठाण्यातील एक अशा चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही पुन्हा १८ वर गेली आहे.

Two from Mumbra overcame the corona while four, including one from the headquarters, were infected | मुंब्य्रातील दोघांची कोरोनावर मात तर मुख्यालयातील एकासह चौघांना लागण

दोन अधिकारी आणि १६ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु

Next
ठळक मुद्देमुंब्य्रातील महिलेसह आणखी दोन पोलीस झाले कोरोनाबाधितदोन अधिकारी आणि १६ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एका महिला पोलीस अधिका-याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ठाणे नियंत्रण कक्षातील आणखी एका पोलीस कर्मचा-याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मुंब्रा पोलीस ठाण्यातील दोघांनी कोरोनावर मात केली असून अन्य एका महिला कर्मचा-यासह दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये कभी खुशी कभी गमचे वातावरण पहायला मिळत आहे.
मुंबईत नागपाडा येथील नियुक्तीवरील उपनिरीक्षक ठाण्यात वास्तव्यास होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची उपनिरीक्षक पत्नी तसेच आई आणि दोन वर्षांची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली. या चौघांवरही मुंबईतील सेव्हन हिल्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने पोलीस वसाहत आणि नियंत्रण कक्षात काहीसे भीतीचे वातावरण असतांनाच शनिवारी नियंत्रण कक्षातील आणखी एका कर्मचाºयाची तपासणीही पॉझिटिव्ह आली. त्यानंतर नौपाडयातील एक कर्मचारी तर मुंब्रा पोलीस ठाण्यातील एक महिलेसह दोघांना रविवारी लागण झाली आहे. या चौघांनाही रुग्णालयात दाखल केले आहे.
आतापर्यंत सहा अधिकारी आणि ३३ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील चार अधिकारी आणि १५ कर्मचा-यांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे आता दोन अधिकारी आणि १८ कर्मचा-यांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुंब्य्रातील दोघांना भार्इंदर पाडा येथील उपचार केंद्रातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचे ठाणे पोलिसांनी टाळया वाजवून स्वागत केले.

Web Title: Two from Mumbra overcame the corona while four, including one from the headquarters, were infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.