उल्हासनगर : निवासी इमारतीत बेकायदा व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. तसेच दोन अल्पवयीन मुलींसह एका महिलेची सुटका केली असून त्यांच्याकडून मोबाइल व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.उल्हासनगर कॅम्प नं.-३ परिसरातील निवासी क्षेत्रातील प्रकाशदीप इमारतीमध्ये बेकायदा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली. शुकवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला असता दोन अल्पवयीन मुलींसह एका महिलेकडून सोनम व लक्ष्मी नावाच्या महिला बेकायदा व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. सोनम हिच्या घरी ग्राहकांच्या मागणीनुसार लक्ष्मी नावाची महिला मुली पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लक्ष्मी हिच्या किती मुली संपर्कात आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.कॅम्प नं.-३ परिसरातील निवासी इमारतीमध्ये बेकायदा व्यवसाय सुरू असल्याची माहिती उघड झाल्यावर परिसरात संताप व्यक्त होत आहे. सोनम नावाच्या महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घर भाड्याने घेऊन बेकायदा व्यवसाय सुरू केला होता. तर, लक्ष्मी नावाची महिला ग्राहकांच्या मागणीनुसार मुली व महिला पुरवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अल्पवयीन मुलीची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात केली असून महिलेला सोडून देण्यात आले.
बेकायदा व्यवसायप्रकरणी दोन महिलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 2:35 AM