उल्हासनगर भाजपला खिंडार, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे शिवसेना ठाकरे गटात

By सदानंद नाईक | Published: January 7, 2024 07:44 PM2024-01-07T19:44:49+5:302024-01-07T19:44:59+5:30

आमदार किणीकर यांचे टेन्शन वाढले

Ulhasnagar BJP, opposition leader Wankhade went into Shiv Sena Thackeray group | उल्हासनगर भाजपला खिंडार, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे शिवसेना ठाकरे गटात

उल्हासनगर भाजपला खिंडार, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे शिवसेना ठाकरे गटात

सदानंद नाईक
उल्हासनगर :
भाजपचे विरोधी पक्षनेते 4 राजेश वानखडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश घेतला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वानखडे यांना शिवबंधन बांधले असून शहर शिवसेनेत उत्साह संचारला आहे.

उल्हासनगरच्या राजकारणात राजेश वानखडे यांचा दबदबा असून महापालिकेत ते भाजपचे विरोधी पक्षनेते पदी होते. तसेच शहर कार्यकारिणीत महासचिव पद भूषविले आहे. सन-२०१४ च्या अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून शिवसेनेचे बालाजी किणीकर यांच्या तोंडाला त्यांनी फेस आणला होता.

आमदार किणीकर यांना ४६ हजार तर राजेश वानखडे यांना तब्बल ४५ हजार मतदान झाले होते. अवघ्या एक हजार मताचा फरकाने किणीकर हे विजयी झाले होते. येणाऱ्या अंबरनाथ विधानसभेचे उमेदवार म्हणून राजेश वानखडे यांना आश्वासन दिल्याचे बोलले जात होते. वानखडे शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्यासाठी कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

राजेश वानखडे यांच्या प्रवेशने शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली असून लोकसभा निवडणुकी पूर्वी भाजप, शिवसेना शिंदे गटसह इतर पक्षातील नेते शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याचे संकेत यावेळी जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी दिले. वानखडे यांच्या प्रवेशने अंबरनाथ, कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा व कल्याण लोकसभेवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. वानखडे हे शहरातील नामांकित तक्षशिला शिक्षण संस्थेचे महासचिव असून आंबेडकरी समाजात त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे.

आमदार किणीकरचे टेन्शन वाढले 
सन-२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील आमदार किणीकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले राजेश वानखडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे. ठाकरे गटाकडून राजेश वानखडे हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहणार असून आमदार किणीकर यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे किणीकर यांचे टेंशन वाढले असून कल्याण लोकसभेवरही त्याचा परिणाम होणार आहे.

Web Title: Ulhasnagar BJP, opposition leader Wankhade went into Shiv Sena Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.