ठाणे : उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे उल्हासनगर येथील बहुतांशी परिसरात सुमारे तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही, यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडण्याच्या प्रयत्नात असताना आंघोळीला ही पाणी न मिळाल्यामुळे उल्हासनगरमधील नागरीक ठिकठिकाणी देशाच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनपासून वंचित राहिले आहेत.
या समस्येचा गैरफायदा घेत मनपाच्या बोरिंगच्या पाण्यासाठी दादागिरी करीत नागरिकांकडून पैशांची वसुली काही ठिकाणी करण्यात आली . दुरुस्तीसाठी मनपाच्या लोकांना पैसे द्यावे लागत असल्याचे कारण ऐकायला मिळाले. या समस्येची जाणीव एक दिवस आधीच मनपाचे उपायुक्त संतोष देहेरकर यांच्या लक्षात आणून दिले होते. पण दिलेले आश्वासन नेहमीप्रमाणे पोकळ ठरले. पाणी आलेले नाही. काही ठिकाणी जुन्या लाइनला ही पाणी नाही तर एमआयडीसीच्या लाइनला ही पाणी आलेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. आधिकारी फोन ही घेत नसल्याचे ही सांगितले तरी ही देहेरकर यांनी ही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले.
प्रजासत्ताक दिनी नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.