ऑनलाइन लोकमत
भिंवडी, दि. १२ - ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतल्या कासिमपूरा भागातील एका पॉवरलूम फॅक्टरीमध्ये भडकलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. १०० पेक्षा जास्त नागरीक या आगीमध्ये अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवून अडकलेल्या नागरीकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले.
या इमारतीच्या तळमजल्यावर पॉवरलूम फॅक्टरी तर, वरचे मजले निवासी आहेत. तळमजल्यावरील फॅक्टरीमध्ये भीषण आग भडकल्यानंतर वरती रहाणा-या रहिवाशांनी स्वत:ला वाचवण्यासाठी गच्चीवर धाव घेतली. वृत्तवाहिन्यांवरील दृश्यामध्ये अनेक जण गच्चीवर मदतीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत होते. ही इमारत सहा ते सात मजली आहे. सकाळी सातच्या सुमारास इथे आग भडकली.
अग्निशमन दलाचे सात वॉटर टँकर घटनास्थळी पोहोचले असून, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर येथून अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
Thane (Maharashtra):Fire breaks out at a garment factory in Bhiwandi, people being rescued with the help of a ladder pic.twitter.com/ql9bo02duk— ANI (@ANI_news) April 12, 2016