मुंब्य्रात नांदते अनोखी राष्ट्रीय एकात्मता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 01:32 AM2019-09-04T01:32:25+5:302019-09-04T01:32:47+5:30

पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेशोत्सव अन् मोहरम : आरती-मजलिस एकाच माइकवर

The unique national unity that lies in Mumbai | मुंब्य्रात नांदते अनोखी राष्ट्रीय एकात्मता

मुंब्य्रात नांदते अनोखी राष्ट्रीय एकात्मता

Next

कुमार बडदे 

मुंब्रा: ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना’ या काव्यपंक्तीनुसार वेळोवेळी वागून राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देणाऱ्या मुंब्य्रातील रहिवाशांनी पुन्हा एकदा एकाच मंडपात तसेच जवळजवळ गणेशोत्सव आणि मोहरमचे कार्यक्र म सादर करून नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अनोखी राष्ट्रीय एकात्मता दाखविली आहे.

अनोख्या राष्ट्रीय एकात्मतेमुळे एका ठिकाणी तर एकाच स्पिकरमधून आरती आणि मजलिसचे (मोहरनिमित्त साजरा होणारा धार्मिक कार्यक्र म) सूर बाहेर निघत असल्याचे विरळ दृश्य दिसत आहे. नेहमीच एक दुसºयाच्या धर्माचा, भावनांचा आदर करून सण, उत्सव साजरे करणारे येथील हिंदू-मुस्लिम सध्या पाच ठिकाणी गणपती आणि मोहरमचे कार्यक्र म साजरे करत आहेत.
नेहमीच संयमाने वागून येथील नागरिकांनी वेळोवेळी एकोपा जपला आहे. दोन्ही धर्मातील रु ढी,परंपरा याचा आदर करण्याची यापूर्वीची परंपरा कायम ठेवण्याच्या हेतूने येथील काही गणेश मंडळांनी आणि मोहरम कमेटीने गणेश उत्सव आणि मोहरमचे कार्यक्र म एकाच मंडपात साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आनंद कोळीवाडा येथील गणेश मित्र मंडळ तसेच विश्व मित्र मंडळ आणि चर्णीपाडा येथील एकता मित्र मंडळाचे पदाधिकारी व मोहरम कमेटीचे पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर बैठक घेतली. त्यात झालेल्या चर्चेअंती दोन्ही कडच्या पदाधिकाºयांनी एकाच मंडपात गणपती उत्सव तसेच मोहरमचे कार्यक्र म करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती एका पोलीस अधिकाºयांनी दिली.

पोलीस आयुक्तांनी केला सत्कार
च्गतवर्षीही त्यांनी राबवलेल्या या अनोख्या कल्पनेबद्दल काही मंडळाचा आणि मोहरम कमेटीमधील पदाधिकाºयांचा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते नुकताच ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या समारंभात सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. दोन्ही समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी दाखवलेल्या या सामजस्यांबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
च्गणेश मित्र मंडळाच्या मंडपात तर आरती तसेच मोहरम निमित्त होणारी मजलिस आणि थेट प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमासाठी दररोज एकाच माईकचा आणि स्पिकरचा वापर करण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ सावंत आणि सल्लागार गिरिष आहिरे तसेच कार्यकर्ते प्रदीप देवरु खकर आदींनी लोकमतला दिली.

Web Title: The unique national unity that lies in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.