शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांवर विद्यापीठाने त्वरीत तोडगा काढावा : अभाविप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 02:10 PM2020-07-28T14:10:05+5:302020-07-28T14:10:13+5:30

अभाविपने केलेल्या मागण्यामध्ये मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन नोंदणी साठीची मुदत आणखी 10 दिवस वाढवून द्यावी.

University should immediately address the problems encountered in the academic admission process: Abhavip | शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांवर विद्यापीठाने त्वरीत तोडगा काढावा : अभाविप

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांवर विद्यापीठाने त्वरीत तोडगा काढावा : अभाविप

googlenewsNext

डोंबिवली:  कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहे. विद्यार्थ्यानी प्रवेशासाठी नोंदणी सुरू केली आहे. ही नोंदणी करत असताना विद्यार्थ्याना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्वरित या सर्व प्रक्रियेत लक्ष घालून समस्यांच निराकरण करांव. "कोविड १९ आलेल्या संकटाशी लढा देताना शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या समस्यांचा नव्या संधींचा सकारात्मक दृष्टिने विचार करण्याची आज आवश्यकता आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन शिक्षणात येणाऱ्या अडचणी व त्यातून मार्ग काढावा, असे कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार म्हणाल्या. त्यासंदर्भात त्यांनी विद्यापीठ कुलगुरूंना मंगळवारी पत्र पाठवले आहे.

अभाविपने केलेल्या मागण्यामध्ये मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन नोंदणी साठीची मुदत आणखी 10 दिवस वाढवून द्यावी. गेल्या वर्षाची  “कट ऑफ लिस्ट” महाविद्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावी. महाविद्यालयात उपलब्ध असलेले विषय आणि त्यांचे विषय कोड हे स्पष्टपणे समजतील अशाप्रकारे महाविद्यालयच्या वेबसाईटवर असावेत.  महाविद्यालयांनी त्यांचे प्रॉसपेक्ट्स विनामुल्य महाविद्यालयांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावेत. ऑनलाईन / ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यापद्धतीने प्रवेशांचे नियोजन व्हावे. उदा. ऑनलाईन प्रवेशासाठी चे सर्व्हर कोणत्याही तांत्रिक कारणाने बंद पडणार नाही अथवा त्याचा वेग कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. 

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्यात यावे. आँनलाईन फॉर्म महाविद्यालयांत जमा करण्याची सक्ती असू नये.  त्यासाठी फोटो काँपी व्हॉटसअँप किव्हा अन्य माध्यमांचा वापर करत सबमिट करून घ्यावे. सर्वर डाउन अथवा अन्य अपडेट्स साठी सोशल मीडियाचा वापर करण्यात यावा व तसे त्वरित महाविद्यालयांत  कळवावे.  दरवर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत येणारा घोळ व त्यामुळे विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी तसेच समस्या सोडविण्यासाठी तज्ञांची '24×7 हेल्प लाईन' आदी मागण्या केल्या आहेत.

Web Title: University should immediately address the problems encountered in the academic admission process: Abhavip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.