ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगर येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झाडाझुडपात दडलेल्या सात फुटी अजगराला पुनर्वसू या वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सुखरुपपणे ताब्यात घेतले. शुक्रवारी सायंकाळी याठिकाणी अजगराचे दर्शन होताच स्थानिकांनी संस्थेचे प्रमुख गणेश नाईक यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर, नाईक यांनी तात्काळ आपल्या मित्रांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली होती.
इंदिरा नगर परिसरात सायंकाळी झाडाझुपात अजराचे दर्शन झाले. त्यामुळे, परिसरातील नागरिक भयभतीय झाले होते. हे अजगर दिसायला मोठे असल्याने बघ्यांचीही गर्दी व्हायली. त्यावेळी नाईक यांना बोलावणे केले असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सहकाऱ्यांच्या मदतीने या अजगराला ताब्यात घेतले. ठाणे वनविभागाच्या मदतीने या अजगराला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली. दरम्यान, अजगराला सर्पमित्रांनी ताब्यात घेतल्यामुळे अनेकांच जीव भांड्यात पडला. परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.