Video - ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण

By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 3, 2023 05:39 PM2023-08-03T17:39:53+5:302023-08-03T18:22:32+5:30

एनसीसीचे प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्याला मारहाण केली जात आहे. 

Video - NCC students beaten up in Joshi Bedekar College, Thane | Video - ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण

Video - ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण

googlenewsNext

ठाणे - जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडीओ गुरूवारी व्हायरल झाला असून याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या घटनेचा सगळीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. ही घटना दुर्दैवी असून मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. एनसीसीचे प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्याला मारहाण केली जात आहे. 

बुधवारी घटना घडली. त्याचा व्हिडीओ मात्र गुरूवारी व्हायरल झाला. याबाबत महाविद्यालयानक्त्या संबंधित विद्यार्थ्यावर कारवाईची भूमिका घेतली आहे. प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक म्हणाल्या की, ज्याने मारहाण केली तो विद्यार्थी विज्ञान शाखेचा आहे. कालच या घटनेबाबत वि.प्र.मंकडे कारवाईसाठी पाठवले होते. एनसीसीने आतापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. हे घडत असताना दोन मुले तिथे आली असती तर ही घटना तिथल्या तिथे थांबवता आली असती. त्या विद्यार्थ्यावर कारवाई होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  ही २६ जुलै रोजीची घटना आहे. लायब्ररी मधून एका माजी विद्यार्थिनीने हा व्हिडिओ तयार केला होता. व्हिडिओ बनवणारी ही विद्यार्थीनी फक्त अभ्यासासाठी येत होती. तिला बाहेरून ओरडताना आवाज आला आणि व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ स्टेटस ला ठेवला, ज्यांनी स्टेटस laa pahile त्या दोन - तीन जणांनी तो व्हिडिओ शेअर केला आणि तो आज प्रसार माध्यमातून viral झाला. जिने व्हिडिओ काढला तिची तक्रार नाही, विद्यार्थ्यांची तक्रार अजून आलेली नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Video - NCC students beaten up in Joshi Bedekar College, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे