ठाणे : म्हाडांच्या घरांना मिळालेला लाभ हा भविष्यात मोठे आव्हान असणार आहे. परंतु असे असले तरी प्रत्येकाच्या घराचे स्वप्न साकार करणोही गरजेचे आहे. त्यामुळेच आता गाव तिथे म्हाडा ही संकल्पना राबविली जाणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्याचा कृती आराखडा देखील तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हाडाच्या माध्यमातून ८ हजार ९८४ घरांची सोडत गुरुवारी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात काढण्यात आली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. आज जो काही प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे लोकांना घराची किती गरज आहे, हे समजले. त्यामुळे भविष्यात निश्चितच आव्हान असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हाडाच्या माध्यमातून महाड येथे उधवस्त झालेल्या गावांच्या ठिकाणी ६०० चौरस फुटांची २६१ घरे उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले मागील २५ वर्षे रखडलेला बीडीडी चाळीची पुनर्विकासही आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. ठाण्यातील वर्तकनगर भागात म्हाडाच्या माध्यमातून १२०० घरे उपलब्ध होणार आहेत. त्यातील ४०० घरे ५०० चौरस फुटांची असणार ती पोलिसांसाठी असणार आहेत.
उर्वरीत घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय नवीमुंबईत आयटी सेक्टर वाढत आहे, त्याठिकाणी झोपडपटया देखील अधिक आहेत. परंतु आता एसआरए योजनेचा विस्तार हा ठाणो जिल्ह्यात झालेला आहे. त्यामुळे नवीमुंबईत झोपडपटटींचा पुनर्विकास करुन त्याच ठिकाणी आयटी सेक्टरलाही जागा उपलब्ध करुन दिल्यास नागरीकांना घराजवळच नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतील, त्यामुळे यावर विचार करावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी संबधींत विभागाला दिल्या. मोतीलाल नगर येथील १४६ एकरचा भुखंड उपलब्ध झालेला आहे, त्याठिकाणी देखील विकास करणो शक्य होणार आहे. पत्रचाळीचा पुनर्विकासही आता सुरु झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कन्मवार नगर, टागोर नगर आदी भागातील एका एका इमारतीचा विकास न करता त्याचा एकत्रित कृती आराखडा तयार करुन येथील इमारतींचा पुनर्विकास केल्याने मराठी माणसाला त्याठिकाणी स्वस्तात घरे उपलब्ध होतील त्यादृष्टीनेही विचार करावा अशा सुचना त्यांनी केल्या. ठाणो जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापुर, घोडबंदर आदी कुठेही २५ एकर र्पयत जागा उपलब्ध करुन दिल्यास त्याठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून विकास करण्यास सोईच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करतांना ही जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही त्यांनी केली.