लॉकडाऊन उठताच सोशल डिस्टन्सचा फज्जा, मास्क नसल्यास १५०० रुपयाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 05:22 PM2020-07-23T17:22:48+5:302020-07-23T17:24:18+5:30
सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानावर पालिका पथकाचा वाॅच राहणार असून दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होणार आहे.
उल्हासनगर : महापालिकेने प्रतिबंधक क्षैत्र वगळता इतरत्र लॉकडाऊन उठविल्याने, नागरिकांनी खरेदीसाठी दुकानात गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून कोरोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानावर पालिका पथकाचा वाॅच राहणार असून दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होणार आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने महापालिकेने २ ते १२ जुलै पर्यंत पहिला तर १२ ते २२ जुलै दरम्यान दुसरा लॉकडाऊन जाहीर केला. दुसऱ्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यासह नागरिक व बहुतांश राजकीय नेत्यांनी विरोध करून नाराजी व्यक्त केली. तसेच २२ जुलै नंतर लॉकडाऊन वाढवू नका. असे पत्र व्यापारी संघटनेने पालिका आयुक्तांना दिले. अखेर आयुक्तांनी प्रतिबंधक क्षैत्र वगळता इतर लॉक डाऊन उठविला आहे गेल्या २० दिवसानंतर सम व विषम तारखेला दुकानें सुरू झाल्याने, नागरिकांनी दुकानात एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. सोशल डीस्टन्सचा सर्वत्र फज्जा उडाल्याचे चित्र असून याप्रकाराने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दुकानांनी सम व विषम तारखेला दुकान उघडी ठेवायचे आदेश दिले आहे. दुकानदारांनी सोशल डिस्टन्सचे पालन केले नाहीतर, पहिल्या वेळी १० तर दुसऱ्या वेळी १५ हजार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर तिसऱ्या वेळी सोशल डिस्टन्सचा भंग केल्यास दुकानें बंद ठेवण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाहीतर दंडात्मक कारवाई होणार आहे. पहिले वेळा १० तर दुसरी वेळा १५ हजार दंडात्मक कारवाई होणार असून तिसरी वेळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसे पत्रक महापालिकेने प्रसिध्द केले. महापालिकेने प्रतिबंधक क्षैत्र वगळून लॉकडाऊन उठविल्याने व्यापाऱ्यासह नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तर नाका कामगारासह इतरांनी हाताला काम मिळाल्यास कुटुंबाची होणारी उपासमार थांबणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
महापालिकेचा दुकानावर वाॅच
गेल्या २० दिवसानंतर प्रतिबंधक क्षैत्र वगळून लॉकडाऊन उठवल्याने, नागरिकांनी मार्केटमध्ये एकच गर्दी केली. सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानदारासह नागरिकांवर दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल होणार आहे. त्यासाठी महापालिका पथक वाॅच ठेवून कारवाई करणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा
मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी
कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी
विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं
कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा