जनार्दन भेरे
भातसानगर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेला अतिशय महत्त्व आहे. ६५ टक्के बिगर आदिवासी समाज असूनही अ. ज. साठी राखीव मतदारसंघ म्हणून आरक्षित असलेला हा मतदारसंघ. या मतदारसंघाने राजकीयदृष्टया अनेक चढउतार पाहिले असून यात केवळ राजकीय पुढाऱ्यांच्या स्वार्थापायी बळी जातो तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, ही वस्तुस्थिती आहे. धरणे असूनही पाचवीला पुजलेली पाणीटंचाई, बेरोजगारी यामुळे येथे मतदारत्रस्त आहेत.
येत्या पंधरा दिवसांत विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. यामुळे प्रत्येक इच्छुची व्युहरचना सुरू आहे. कुणी तिकीट मिळविण्याच्या,कुणी पक्ष प्रवेश करून स्वार्थ साधण्याच्या तयार आहे. परंतु, दलबदलूंना मतदार स्वीकारतील का हा प्रश्न या मतदारसंघात जोरात चर्चिला जात आहे. शहापूर विधानसभेची निवडणूक प्रत्येक वेळी अटीतटीच्या ठरली आहे कुणी कितीही वल्गना केल्या तरी आता काळ बदललाय त्यामुळे सध्यस्थीतीत कोणताही उमेदवार आपल्या विजयाची खात्री मात्र देवू शकत नाही, हे मात्र खरे आहे. आज तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असली तरी उद्या याच पक्षातील निष्ठावंतांना जर तिकीट मिळाले नाही तर कुणी कितीही स्पष्टेक्ती दिली तरी बंडाळी ही होणारच! हे अटळ आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतले आहे. कायम वर्षांनवर्षांपासून शिवसेनेशी वैर ठेवून आपल्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेसची मेढ जपणारे असे अचानक राजकीय स्वार्थीपायी शिवसेनेत जातील यावर कुणाचा विश्वासही बसत नसला तरी ते राजकीय स्वार्थापायी खरे ठरले. आज त्यांच्याबरोबर बोटावर मोजण्याइतके नेते गेले असले तरी कार्यकर्ते मात्र गेले नसल्याचे बोलले जाते.
आज पुलाखालून बरेच पाणी गेले असून येणाºया निवडणुकीत बिगर आदिवासींचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार असून गेल्या पाच वर्षांत विधानसभेत विषय मांडून त्यावर समिती नेमून सकारात्मक निर्णय घेण्याचे अमिष दाखिवल्यानंतरही पुढे काही झाले नाही. त्यामुळे केवळ आमदार पांडुरंग बरोरा यांच्याकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीही साध्य झाले नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ज्यांनी हे केले तेच मधुकर पिचड आता भाजपावासी झाल्याने आता हा मुद्दा हटविण्यास भाजपला अडचणीचा ठरणार असून तो हटविल्यास मात्र शहापूर विधानसभेत भाजपचा उमेदवार निवडून येण्यास फारशी अडचण येईल असे वाटत नसल्याचे चित्र आहे . ६५ टक्के बिगर आदिवासी असूनही तालुक्यात त्यांच्यावर अन्याय केल्याने मतदारांमध्ये तणावाचे वातावरण झाले आहे याचा जर उद्रेक झाला तर मात्र उमेदवारांना वचननाम्यांच्या आश्वासनांचा यादीत प्रथम प्राधान्य द्यावे लागणार आहे. तालुक्यात करोडो रुपयांचा निधी आला खरा मग उपाययोजना मात्र कुचकामी ठरल्या आहेत.
बेरोजगारांच्या समस्या कायम असून त्या सुटण्याची आशा धूसर बनल्या आहेत. तीन धरणे असतांनाही अनुकंपाच्या समस्यांही तशाच आहेत. सध्या गणेशोत्सव असल्याने बिघडलेली समिकरणे घरोघरी गणपती दर्शन घेऊन बदलण्याची किमया साधण्याचे प्रयत्न सुरू आहेतशहापूर मतदारसंघात अनेक वर्षांपासून केवळ पैशांच्या जोरावर उमेदवार निवडून येतो, असा म्हणण्याचा प्रघात आहे. तर नेत्यांची नसन्नस उमेदवारांना माहीत आहेत, कारण उमेदवार तेच केवळ पक्ष बदल म्हणजेच दारू तीच केवळ बाटली बदल, अशी अवस्था आहे.१ निवडणुकीला वेगळीच दिशा मिळाली असून तालुकात वातावरण तापले आहे. यामुळे भाजप शिवसेनेचे नेते कितीही वल्गना करीत असले तरी युती होण्याची शक्यता धूसर होत चालल्याने बरोरा यांना शिवसेनेत येऊनही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. तर नुकताच तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांच्या बरोबर पाच इच्छुक उमेदवारांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावून निष्ठवंतांना उमेदवारी देण्याची मागणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. अर्थात हा आटापिटा होता सेनेत आलेल्या पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी न देण्यासाठीच अर्थात मातोश्रीच्या आश्वासनांमुळे सर्वच कामाला लागले आहेत. पण आमदार बरोरा यांना उमेदवारी मिळणार असून मातोश्रीने तसे त्यांना आश्वासन दिल्यानेच त्यांनी पक्ष प्रवेश केल्याचे निकटवर्तीय सांगतात.२या विधानसभा क्षेत्रात नाही म्हटले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे हा पक्ष आपला उमेदवार उभा करून मोठी टक्कर देईल. परंतु, भाजपाला कधी नव्हे इतके चांगले दिवस असल्याने ते ही तगडे आव्हान उभे करून शहापूर विधानसभेच्या निवडणुकीचे निकालाचे चित्र वेगळे ठरविण्यास सज्ज झाले आहेत. कारण काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या कपिल पाटील यांना तब्बल १६ हजार मतांची मिळाले होते. त्यामुळे भाजपाचे हौसले या विधानसभेवर बुलंद होणे सहाजिकच आहे.३मागील दोन पंचवार्षिकचा विचार केला तर २००९ च्या निवडणुकीत सेनेचेदौलत दरोडा १२ हजार मतांनी निवडून आले होते. दौलत दरोडा यांना ५८ हजार ३३४ तर राष्ट्रवादी काँग्रेस चे पांडुरंग बरोरा यांना ४६ हजार ६५ मते मिळाली होती. मनसेचे ज्ञानेश्वर तळपाडे यांना १७ हजार ४०१ मते मिळाली होती. मात्र आज मनसेची तितकी ताकद राहिली नाही. परंतु, वंचित आघाडीखी डोकेदुखी या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत वाढणार आहे. या मतदारसंघात वंचित आघाडी आपले मताधिक्य वाढवून एखाद्या उमेदवाराला पाडण्यास मात्र कारणीभूत ठरू शकते.४ २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग बरोरा हे ५ हजार ५४४ मतांनी विजयी झाले होते. त्यांना ५६ हजार ७०२ मते मिळाली तर शिवसेनेचे दौलत दरोडा यांना ५१ हजार १७४ मते मिळाली होती. तर भाजपाचे अशोक इरनक यांना १८ हजार २२२ मते, तर मनसेचे ज्ञानेश्वर तळपाडे यांना ६ हजार ५६८ मते मिळाली होती. काँग्रेसचे पद्माकर केवारी यांना ६ हजार ६८४ मते मिळाली होती.