भिवंडीत घराची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांची तीन तासानंतर सुटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 06:34 PM2020-09-02T18:34:33+5:302020-09-02T18:34:42+5:30

भिवंडी ( दि. 2 )  सर्वत्र विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच शहरातील अंजुरफाटा शिवाजीनगर येथे एक बैठ्या घराची भिंत कोसळल्याची ...

The wall of the house in Bhiwandi collapsed; two were released after three hours in critical condition | भिवंडीत घराची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांची तीन तासानंतर सुटका 

भिवंडीत घराची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांची तीन तासानंतर सुटका 

Next

भिवंडी ( दि. 2 )  सर्वत्र विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच शहरातील अंजुरफाटा शिवाजीनगर येथे एक बैठ्या घराची भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. झालेल्या दुर्घटनेत घरा शेजारील गल्लीत ड्रेनेज पाईप लाईन साठी खोदकाम करणारे तीन मजुरांसह स्थानिक एक युवक जखमी झाला असून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन मजूर अडकून पडले होते या दोघा मजुरांना अग्निशमन दलाच्या जवांनासह स्थानिकांनी तब्बल तीन तासांनी जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

           अंजुरफाटा शिवाजीनगर येथील सार्वजनिक शौचालया नजीकच्या दुमजली इमारत व या दुर्घटनाग्रस्त घरामधील अरुंद गल्लीत इमारतीच्या शौचालयाच्या मलनि: सारण पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी या अरुंद गल्लीत तीन मजूर खोदकाम करीत असताना या खोदकामामुळे नजीकच्या घरा खालील पाया धसल्याने या घराची भिंत कोसळली या दुर्घटनेत ढिगाऱ्या खाली खोदकाम करणारे विशाल , अनुष व विष्णुदेवा चव्हाण हे तीन मजूर अडकून पडले होते .तर त्यावेळी त्या ठिकाणाहून जाणारा स्थानिक युवक गणेश हा जखमी झाला आहे . विष्णुदेवा ने स्वतःची सोडवणूक करून घेतल्या नंतर घटनास्थळी दाखल अग्निशामक दल व आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्या खाली अडकून पडलेल्या दोन मजूरांची तीन तासाच्या प्रयत्न नंतर  सुटका करण्यात यश मिळविले.

            कविता चंद्रमौळी एलगट्टी या विधवा महिलेचे हे घर असून ती आपल्या दोन लहान मुलींना घेऊन घराबाहेर बसली असल्याने ती सुदैवाने बचावली असून मागील तीन दिवसांपासून खोदकाम सुरू असल्या मुळे भिंतीचा आवाज येत असल्याची तक्रार तिने इमारती मधील व्यक्तींकडे केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने सदरची दुर्घटना घडली असून घटनास्थळी महानगरपालिका मुख्यालय उपायुक्त डॉ . दीपक सावंत , सहाय्यक आयुक्त नूतन खाडे ,नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी भेट देत मदातकार्याची माहिती घेतली असून जखमींवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: The wall of the house in Bhiwandi collapsed; two were released after three hours in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.