ठाण्यातील भटकंती कट्ट्यावर भटक्यांनी घेतली वीरगळीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 05:28 PM2019-11-14T17:28:27+5:302019-11-14T17:31:36+5:30
ठाण्यातील भटकंती कट्ट्यावर भटक्यांनी वीरगळीची माहिती जाणून घेतली.
ठाणे : ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर यानी वीरगळ विषय अगदी सोप्या भाषेत भटक्यांना पटवून दिला भविष्यात या विषयी जागरुकते सोबत हा ऐतिहासिक वारसा जपून राहावा यासाठी पर्यंत करावेत असे आवाहन त्यांनी केले.भटकंती कट्टा ठाणेचा तिसरा भाग मंगला शाळा ठाणे पूर्व पार पडला. यावेळी. १३० हून अधिक भटक्यांनी याला हजेरी लावली.
दर महिन्यातून एकदा ठाण्यात भटकंतीच्या निगडीत विषय घेऊन कट्टा होणार आहे. कट्ट्याचा माध्यमातून सम विचारांची लोक एकत्र यावी हा या मागचा हेतू आहे. निसर्गात भटकताना अनेक विषय अभ्यासात येऊ शकतो हेच या माध्यमातून सूचित करता येते. लोक सहभागातून उभा राहिलेला हा भटकंती कट्टा ठाणे लवकरच लोकांचा पसंतीस येऊ लागाला आहे या बाबत शंकाच नाहि. असे आयोजकांनी सांगितले. महाराष्ट्रत साधू संत आणि धारातीर्थ ही दोन्ही भक्ती भावाने पुजली जातात. देव- देश आणि धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरपुरुषांच्या वीरकथा, साधू संतांचे महान संदेश आणि सतींची अग्नीदिव्य या सार्या गोष्ठी जनमानसाला भारावून टाकत असतात. यावर विपुल साहित्याची निर्मिती झाली आहे. गावगप्पा, आख्यायिका, कथा, कांदबरी नाटके या खेरीज पोवाडे, नात्य संगीत याद्वारे वीरांचे गुणगान करण्यात आले आहे. गावाच्या किंवा राज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले त्यासाठी गावकर्यांची चिरंतर राहतील अशी उचित स्मारके उभारली, संतांच्या समाध्या बांधल्या आणि सतीचे वृंदावन अथवा सातीशीळा बांधल्या. पुढच्या पिढीला या मागून स्पुर्ती आणि प्रेरणा मिळावी हाच या मागील घेतु होता. वीरगळ म्हणजे युद्धाच्या स्मारक शिळा. एखद्या विराला कोणत्या कारणाने वीरगती प्राप्त झाली आहे याचे वर्णन या विरगळीच्या रुपात शिल्पांकित केले जाते. इंग्रजी भाषेत विरगळीस हिरो स्टोन म्हटले आहे. उत्तर भारतात त्याला वीरब्रम्ह, दक्षिणेकडे कानडीत कल्लू तर केरळात तर्रा असे म्हटले जाते. कानडी शब्द कर म्हणजे दगड याच शब्दा वरून विरगळ हा शब्द महाराष्ट्रात रूढ झाला. एक फुट ते बारा फुटापर्यंत विरगळ आढळून येतात. सह्याद्री मध्ये भटकतात गावात, एकद्या जुन्या शिवमंदिरात, रणभूमीत अनेक विरागळी सोबत सतीशीळा आपल्याला नेहमीच पाहण्यात येतात. साधारण तीन अथवा अधीक चौकातील वीरांची प्रंसग चित्र कोरलेली असतात. साधारण पणे सगळ्यात खालच्या चौकटील वीर मरण पावण्याचे चित्र दिसते. आणि त्याचा वरच्या चौकातील कोणत्या कारणाने मरण पावला आहे हे चित्र असेते आणि त्याचा त्याचा वर विराला अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहे असे चित्र असते. आणि सर्वात वरच्या चौकातील वीर शिवलिंगाची पूजा करताना दिसतो. आणि त्याच्या वरच्या भागात चंद्र सूर्य काढून विराला वीरगती प्राप्त झाली हे सूचित केले जाते. जो पर्यत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत वीराची कीर्ती कायम राहील हे या मागचे कारण. त्या काळात गोधन हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. गायीच्या रक्षणासाठी वीर कामी आल्याचे चित्र देखील वीरगाळावर दिसून येतात. आपल्याकडे आढळणाऱ्या वीरगळावर कोणतीच माहित नसते त्यामुळे हा वीर नेमका कोण त्याची तिथी वार काहीच काळात नाही. वीराच्या पेहराव वरून काहीसा अंदाज मात्र बांधता येतो. मात्र या उलट गोवा, कर्नाटक , राजस्थान, गुजरात येतील शिल्पांवर त्याची माहित कोरलेली आढळते. वीरांची हि स्मारके चिरंतर टिकावी म्हणून ती दगडात कोरली गेली आहेत या उलट ठाणे नाशिक या आदिवासी भागातील वीरागळे लाकडात कोरलेली आढळतात. त्यांचा मते काळानुसार लाकूड संपून जाते आणि वीराच्या आत्म्याला शांती मिळते. आदिवासी समाजात स्त्रिया सती जात नाही उलट पतीसोबत खांद्याला खांदा लावून त्या शत्रुंच मुकाबला करताना दिसतात, म्हणून त्यांचा सती शिळा आढळत नाही. चुडा भरलेला काटकोनात दुमडलेला हात म्हणजे सती शिळा असते. अश्या शिळा खूप प्रमाणात पाहायला मिळतात. यातील बर्याचच्या स्त्रिया सामजिक दबावाला बळीपडून सती गेल्याचे देखील या शिळा सूचित करतात. याचे कारण सती जाताना आगीतून बाहेर येऊ नये म्हणून दंडुका घेवून बाजूला काही माणसे उभी आहे असे हे दिसतात.आपल्याकडे सगळ्यात सुंदर अशी वीरगळ बोरीवली येथील एक्सर गावात आहेत.