ठाणे : पाण्यासंदर्भातील अडचणी किंवा तक्रारींबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फेसुरु केलेल्या १०७७ हा हेल्पलाईन नंबर खणखणतोय. मागील सहा दिवसात ४० कॉल हे पाणी अमुक दिवसांनी किंवा अनियमित येते असे आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कॉल हे उल्हासनगरातील असून या भागात १५ ते २० दिवसांनी नळाला पाणी येते असल्याचे कॉल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात पाण्याचा प्रश्न मोठयÞा प्रमाणात उद्भवला आहे. त्यातच ठाणे जिल्हयातील विविध धरणातील पाणीसाठा हा अत्यल्प आहे. त्यामुळेच त्याचे १५ जूनपर्यंत नियोजन केले आहे. त्यातच जिल्ह्यातील वेगवेगळया भागात वेगळया स्वरु पात पाणीकपातीस सुरु वात झाली आहे. त्यातच राज्य जलनिती धोरणानुसार पाण्याचा वापर होतो आहे किंवा कसे? सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा पाणीपुरवठा, पाणी टँकर्स याबाबत सर्वसामान्य जनतेच्या तक्र ारींना एकत्र करु न व त्यावर नियमातील तरतुदीनुसार तत्काळ कारवाई करण्यास सोय होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांनी ही हेल्पलाईन सुरु केली आहे. ६ ते १२ एप्रिल या कालावधीत हेल्पलाईनावर ४० तक्र ारी आलेल्या आहेत. यामध्ये ठाणे शहरातील कळवा, डोंबिवली, नवी मुंबई आणि उल्हासनगरमधून तक्रार आल्या आहेत. ठाण्यातील कळवा अनियमित किंवा दोन ते तीन दिवसांची पाणी येते. नवी मुंबईत आठवड्यातून एकदाच पाणी येते तर, डोंबिवलीत तीन ते चार दिवसानी मिळते. तसेच सर्वाधिक तक्र ारी असलेल्या उल्हासनगरात १५ ते २० दिवसांनी पाणी येते असे तक्रारींचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)
पाण्याचा हेल्पलाईन नंबर खणखणतोय
By admin | Published: April 13, 2016 1:45 AM