टंचाईमुळे आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

By admin | Published: October 19, 2015 12:56 AM2015-10-19T00:56:13+5:302015-10-19T00:56:13+5:30

पावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे.

Water shortfall for two days a week due to scarcity | टंचाईमुळे आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

टंचाईमुळे आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

Next

सुरेश लोखंडे, ठाणे
पावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे. या धरणातील पाणी पिण्यासह उद्योगाना १५ जुलैपर्यंत पुरवणे शक्य व्हावे, यासाठी दसऱ्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४२ गावपाड्यांना आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सक्तीची होणार आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४२१४.६७ मिमी पाऊस कमी पडला आहे. आंध्रा धरणात ५०.०६ टक्के पाणी साठा असून तेथे ६४४ मिमी. पाऊस कमी पडला . बारवी धरणात ८९.१९ टक्के साठा असून पाऊस १००५ मिमी कमी झाला. त्यामुळे यावर्षी जादा पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार. गेल्या वर्षी सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमी भरून काढण्यासाठी १४ टक्के कपात झाली होती.
सध्या बारवीत १६०.५६ तर आंध्रात १६९.७० दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे.
त्यातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या पाच महापालिकां, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी आणि भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४२ गावाना या उल्हास नदी व बारवी धरणातून शहरांसह औद्योगाना वर्षभर ३५०.१६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा होणार. सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी दररोज पुरवावे लागणार आहे. दोन दिवसाच्या पाणी कपातीतून ते शक्य होणार आहे.
>सध्या मोहने बंधारा ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचा वापर दैनंदिन कामांसाठी होत असून उर्वरित पाणी खाडीत वाहून जात आहे. ते पाणी लवकरच कमी पडणार आहे. त्या आधी दोन दिवसांच्या कपातीचा निर्णय लागू होणार असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले.
>बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आंध्राचे पाणी उल्हास नदीतून स्टेमघर प्राधिकरणाद्वारे केला जातो. कपातीच्या धोरणामुळे त्यांना आठवड्यातून दोन दिवसांचे पाणी उचलण्यास मनाई केली जाणार आहे.

Web Title: Water shortfall for two days a week due to scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.