ठाकुर्लीच्या मंगलकलशमधील भाजीमंडई सुरु कधी होणार?रहिवाश्यांना हवीय सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 08:22 PM2017-11-09T20:22:02+5:302017-11-09T20:26:22+5:30
ठाकुर्लीतील मंगलकलश सोसाटयीमधील एका इमारतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेची सुमारे ३हजार स्क्वेअर फूटाची जागा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्या जागा सोसायटीने महापालिकेला भाजीमंडईसाठी दिली होती. तसे आराखड्यात मंजूर करण्यात आले होते. मात्र इमारत बांधल्यापासून आतापर्यंत तेथे भाजीमंडई सुरु झालेली नाही. आता तर रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर कारवाई होत आहे, ही संधी असून भाजीमंडई तातडीने सुरु करावी अशी मागणी रहिवाश्यांकडून होत आहे.
डोंबिवली: ठाकुर्लीतील मंगलकलश सोसाटयीमधील एका इमारतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेची सुमारे ३हजार स्क्वेअर फूटाची जागा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्या जागा सोसायटीने महापालिकेला भाजीमंडईसाठी दिली होती. तसे आराखड्यात मंजूर करण्यात आले होते. मात्र इमारत बांधल्यापासून आतापर्यंत तेथे भाजीमंडई सुरु झालेली नाही. आता तर रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर कारवाई होत आहे, ही संधी असून भाजीमंडई तातडीने सुरु करावी अशी मागणी रहिवाश्यांकडून होत आहे.
येथिल रहिवासी राजू शेख यांनी सांगितले की, इमारतीच्या मुख्य भागात ही वास्तू असून बंद वास्तु धुळखात पडुन आहे. तळमजला, पहिला मजला अशी सुमारे तीन हजार स्क्वे.फूट जागा आहे. ठाकुर्लीचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे रहिवाश्यांनी भाजीबाजारासाठी स्थानक परिसरात अथवा डोंबिवलीवर अवलंबून रहावे लागते. या ठिकाणी मंडई सुरु झाल्यास त्रास वाचेल, वेळ वाचेल आणि नागरिकांचा पैसाही वाचेल. यासाठी भाजपाचे दिवंगत नगरसेवक शिवाजी शेलार यांनी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सातत्याने पत्रव्यवहार केला होता. विद्यमान नगरसेवक साई शेलार हे देखिल प्रयत्न करत आहेत, पण नेमकी अडचण कुठे आहे हे समजत नसल्याने समस्या जास्त गंभीर होत आहे.
वास्तु पडून असल्याने तेथे रहिवाश्यांचे लक्ष नसते. अशाचतच उपद्रवी तेथे नागरिकांचे लक्ष नसल्याचा फायदा घेत जातात, मद्यपान करतात. अनेकांनी त्या वास्तूच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या तर काहींनी वास्तुला उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोसायटीचे स्वास्थ धोक्यात आले होते. आता सोसायटीत पूर्णवेळ सुरक्षा रक्षक आहेत, पण तरीही त्यांची नजर चुकवून काही उपद्रवी तेथे जातातच. त्यांना कसे थांबवणार. रात्रीच्या वेळी तेथे अंधार असतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महापालिकेची नेमकी अडचण काय आहे हे तरी रहिवाश्यांना स्पष्ट करावे. तसेच त्या वास्तुचा ताबा घेऊन ती जागा ज्या उद्देशाने महापालिकेला मिळाली आहे त्याचा लाभ तातडीने सगळयांना द्यावा अशीही मागणी रहिवाश्यांनी केली.