लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ज्वेलर्सच्या दुकानातील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून दागिने लुबाडणाºया आयुशी शर्मा (२६) आणि संजू गुप्ता (३४) या दोन सराईत महिला चोरटयांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. त्यांनी राज्यभरात अशाच प्रकारे अनेक ठिकाणी दागिन्यांची लूट केली असून त्यांच्याकडून चार लाख ९२ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.ठाण्याच्या नौपाडयातील गोखले रोडवरील रिचेस ज्वेलर्स आर्केड या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने २३ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन महिलांनी शिरकाव करुन काऊंटरवरील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून तीन लाख २७ हजारांचे ६१.२५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगडया लंपास केल्या होत्या. याप्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने दुकानातील सीसीटीव्हीतील चित्रण तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आयुशी आणि संजू या दोघींना २६ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हयातील मीरा रोड येथून अटक केली. या चोरीतील बांगडयांव्यतिरिक्त त्यांच्याकडून मुंबईतील ओशीवारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एक लाख ६५ हजारांच्या दोन सोन्याच्या बांगडया असे चार लाख ९२ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही कोल्हापूर येथे दोन, पुण्यात दोन तसेच मुंबईत एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.* अशी होती एमओबी-एखाद्या नामांकित सराफाच्या दुकानात प्रभाव पडेल अशा पोशाखामध्ये या दोघी शिरकाव करत असत. नंतर दुकानातील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून त्या दागिने लंपास करीत असल्याचे तपासात उघड झाल्याचे मांगले यांनी सांगितले.
ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लुबाडणाऱ्या सराईत महिला चोरटयांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 5:45 PM
ज्वेलर्सच्या दुकानातील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून दागिने लुबाडणाºया आयुशी शर्मा (२६) आणि संजू गुप्ता (३४) या दोन सराईत महिला चोरटयांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली.
ठळक मुद्दे कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतही केली लूटचार लाख ९२ हजारांचे दागिने हस्तगत