ठाण्यात बांधकाम परवानगीसाठी जागतिक बँकेची नियमावली लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 05:03 AM2019-11-14T05:03:04+5:302019-11-14T05:03:08+5:30

शहरविकास विभागामार्फत बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी दिल्या.

World Bank rules apply for construction permits in Thane | ठाण्यात बांधकाम परवानगीसाठी जागतिक बँकेची नियमावली लागू

ठाण्यात बांधकाम परवानगीसाठी जागतिक बँकेची नियमावली लागू

Next

ठाणे : पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी खाडीकिनारी खारफुटी सफारी करणे, स्थावर मालमत्तांचे नियमन करून त्याचे डिजिटायझेशन करणे तसेच शहरविकास विभागामार्फत बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी दिल्या. तसेच येत्या तीन महिन्यांत शहरातील सार्वजनिक आणि सामूहिक शौचालयांचे अत्याधुनिकीकरण करण्याला प्राधान्य देऊन त्यासाठी समान कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी घनकचरा विभागाला दिल्या.
यासंदर्भात बुधवारी ईवाय या सल्लागार संस्थेसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, समीर उन्हाळे, ईवायचे वरिष्ठ प्रबंधक रुचिर राज महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना आयुक्तांनी ठाणे शहराला लाभलेल्या खाडीकिनारी मँग्रोज ट्रेलर्स सुरू करून पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्यान विभागाने अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर स्थावर मालमत्तांचे नियमन करून त्याचे डिजिटायझेशन करण्याबाबतही महापालिका आयुक्तांनी स्थावर मालमत्ता विभागास सूचित केले.
याबाबत मालमत्तांची वर्गवारी, त्यांची करण्यात आलेली आकारणी, त्याचा कालावधी आदी सर्व माहिती संकलित करून स्थावर मालमत्ता विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी डिजिटायझेशन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. महत्त्वाचे म्हणजे पुढील तीन महिन्यांत शहरातील सर्व सार्वजनिक आणि सामूहिक शौचालये स्वच्छ व नीटनेटकी राहावीत, यासाठी त्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी ईवाय या संस्थेने महापालिकेस कृती आराखडा तयार करून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
>‘अभ्यास करून अहवाल सादर करावा’
पालिकेच्या शहर विकास विभागाच्या माध्यमातून बांधकामासाठी परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची कशी अंमलबजावणी करता येईल, यासाठी ईवाय या संस्थेने अभ्यास करून अहवाल सादर करावा असे सांगितले.

Web Title: World Bank rules apply for construction permits in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.