जागतिक अभियंता दिनी अभियंते सोशल मीडियावर झाले ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:11+5:302021-09-16T04:51:11+5:30

भिवंडी : जागतिक अभियंता दिनानिमित्त सोशल मीडियावरून जगभरातील सर्वच क्षेत्रांतील अभियंत्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र, भिवंडी शहरातील ...

On World Engineers Day, engineers became trolls on social media | जागतिक अभियंता दिनी अभियंते सोशल मीडियावर झाले ट्रोल

जागतिक अभियंता दिनी अभियंते सोशल मीडियावर झाले ट्रोल

Next

भिवंडी : जागतिक अभियंता दिनानिमित्त सोशल मीडियावरून जगभरातील सर्वच क्षेत्रांतील अभियंत्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र, भिवंडी शहरातील मनपा व टोल प्रशासनाकडे अशा सर्वच रस्त्यांची सध्या अत्यंत दुरवस्था झाल्याने भिवंडीकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून भिवंडीतील रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोशल मीडियावर चांगलेच धारण्यात आले. भिवंडीतील रस्ते बनविणारे अभियंते सोडून सर्वांना जागतिक अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अशा पाेस्ट अनेक भिवंडीकरांच्या व्हाॅट्सॲप स्टेट्स आणि व्हाॅट्सॲप ग्रुपवर बुधवारी दिवसभर व्हायरल झाल्या आहेत.

भिवंडी शहरातील सर्वच रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलांवरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर भिवंडीत असलेल्या कशेळी, अंजूरफाटा, माणकोली-चिंचोटी, भिवंडी-वाडा, भिवंडी कल्याण, मुंबई-नाशिक महामार्ग या सर्वच टोल रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खाद्याचे साम्राज्य पसरल्याने भिवंडीकरांना खड्ड्यांचा व रोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने हे रस्ते बनविणारे अभियंते नेमक्या काय पद्धतीने व गुणवत्तेने येथील रस्ते बनवितात, असा सवाल उपस्थित करीत भिवंडीकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून येथील खड्डेमय रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोडून इतर सर्व अभियंत्यांना जागतिक अभियंता दिनाच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. भिवंडीकरांच्या या अनोख्या शुभेच्छा मनपा प्रशासनातील अभियंत्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या चांगल्याच जिव्हारी लागल्या असतील.

Web Title: On World Engineers Day, engineers became trolls on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.