कल्याणमध्ये खड्ड्यात पडून तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:32+5:302021-07-24T04:23:32+5:30

कल्याण : मागील काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-मलंग रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून सागर राठोड (रा. कोळेगाव) हा तरुण ...

Young man injured after falling into pit in Kalyan | कल्याणमध्ये खड्ड्यात पडून तरुण जखमी

कल्याणमध्ये खड्ड्यात पडून तरुण जखमी

Next

कल्याण : मागील काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-मलंग रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून सागर राठोड (रा. कोळेगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या नाक, ओठ व डोळ्य़ाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सागर हा १९ जुलैला रात्री ९ वाजता दुचाकीवरून कल्याण-मलंग रस्त्याने घरी परतत होता. काकाचा ढाब्यासमोर असलेल्या दीड फूट खोल खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. त्याला जखमी अवस्थेत पाहून नागरिकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. सागरचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या घरी तो, त्याची आई, भाऊ आणि वडील असा परिवार आहे. त्याची परिस्थिती बेताचीच असून, त्याच्या उपचाराचा खर्च कुणाल पाटील फाऊंडेशनने उचलला आहे.

रुग्णालयातील डॉ. पवन सैनी म्हणाले की, सागरला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या नाक, ओठ आणि डोळ्याला टाके घालावे लागले आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेमुळे खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण-गांधारी रोडवर दिव्या कटारिया यांचा खड्डा चुकविताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ती तिच्या दिरासोबत दुचाकीवरून चालली असताना हा अपघात झाला होता.

अखेर बुजवला खड्डा

केडीएमसी प्रशासनाने सागरच्या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, खडी टाकून अपघाताला कारणीभूत असलेला खड्डा बुजविला आहे. ज्याप्रमाणे हा अपघातग्रस्त खड्डा बुजविला गेला, त्याप्रमाणे शहरातील अन्य ठिकाणचेही खड्डे बुजविले जावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------------

Web Title: Young man injured after falling into pit in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.