हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी भारतातील 'ही' ठिकाणं आहेत भारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:17 PM2018-12-04T16:17:21+5:302018-12-04T16:17:56+5:30
वातावरणातील गारवा हळूहळू वाढू लागला असून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यातच ईयर एन्ड असल्यामुळे सर्वजण पार्टीमोडमध्ये आहेत. अशातच जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही खास डेस्टिनेशन्स सागंणार आहोत.
वातावरणातील गारवा हळूहळू वाढू लागला असून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यातच ईयर एन्ड असल्यामुळे सर्वजण पार्टीमोडमध्ये आहेत. अशातच जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही खास डेस्टिनेशन्स सागंणार आहोत. ख्रिसमसदरम्यान उत्तर भारतामध्ये थंडी पडलेली असते. तर हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अनेक ठिकाणी बर्फवृष्टीही होत असते. अशाच थंडीत फिरण्यासाठी भारतातील काही ठिकाण उत्तम ठरतील.
1. गोवा
पर्यटकांसाठी गोवा म्हणजे बाराही महिने आकर्षणाचं केंद्र असतं. परंतु थंडीमध्ये गोव्याला फिरण्याची मज्जा काही औरच. गोव्याचे समुद्र किनारे आणि तेथील नाइट लाइफ अनुभवणं एक वेगळा अनुभव असतो.
2. कोडईकनाल
कोडईकनाल तमिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. दक्षिण भारतातील सर्वा प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात.
3. केरळ
'गॉड्स ओन कंट्री' अशी ओळख असणारं केरळ भारतातील सर्वात सुदंर राज्यांपैकी एक आहे. येथील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. समुद्र किनारे, चहाचे मळे यांसारख्या अनेक गोष्टी केरळच्या सौंदर्यात भर घालत असतात. थंडीमध्ये येथील तापमान 25 डिग्री ते 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते.
4. कच्छ
गुजरातमधील कच्छ पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. येथे वर्षभर पर्यटक येत असतात. परंतु येथे डिसेंबरमध्ये फिरायला जाणं फायदेशीर ठरतं. डिसेंबरमध्ये रण उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. हा उत्सव तीन महिने चालतो.
5. पुद्दुचेरी
जवळपास 300 वर्षांपर्यंत फ्रान्सच्या राजवटिखाली असलेलं पुद्दुचेरी अनेक वास्तुशिल्प पाहायला मिळतील. या वास्तुशिल्पांवर पोर्तुगालांची छाप पडलेली दिसते. येथील समुद्र किनारे, जुन्या इमारती आणि महर्षि अरविंद यांचा आश्रम पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे.