जगातल्या सर्वात महागड्या 5 हॉटेल्समध्ये भारताचा नंबर, एका दिवसाचं भाडं 29 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 03:23 PM2018-04-26T15:23:58+5:302018-04-26T15:23:58+5:30
आज आम्ही तुम्हाला जगातल्या टॉप 5 हॉटेल्सची माहिती सांगणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या टॉप हॉटेल्समध्ये भारतातील एका हॉटेलचाही समावेश आहे.
अनेकदा तुम्ही सिनेमांमध्ये भव्यदिव्य अशी हॉटेल्स पाहिली असतील. त्या हॉटेल्सचा शाही थाट पाहून तुम्ही त्या हॉटेलच्या प्रेमातही पडले असाल. या हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्च किती येत असेल असा एक विचारही तुमच्या मनात येऊन गेला असेल. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला जगातल्या टॉप 5 हॉटेल्सची माहिती सांगणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या टॉप हॉटेल्समध्ये भारतातील एका हॉटेलचाही समावेश आहे. या हॉटेल्समध्ये थांबण्याचं एका दिवसाचं भाडं मध्यम वर्गीय लोकांच्या आवाक्या बाहेरचं आहे. या हॉटेल्समध्ये थांबण्याचं एका रात्रीचं भाडं हे एका मर्सिडीज कारच्या किंमती पेक्षाही जास्त आहे. चला बघूयात टॉप हॉटेल्स...
1) द मार्क हॉटेल, न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहर जितकं सुंदर आहे तितकीच सुंदर येथील हॉटेल्स आहेत. जगातल्या सर्वात महागड्या हॉटेल्सचा विषय निघाल्यावर या शहराचा पहिला क्रमांक लागतो. येथील द मार्क हे सर्वात महागडं हॉटेल आहे. येथील पेंट हाऊसमध्ये एक रात्र थांबण्याचं भाडं 55 लाख रुपये आहे. तितक्याच जास्त सुविधा इथे दिल्या जातात.
2) हॉटेल प्रेसिडेंट विल्सन, स्वीस
या यादीत दुसरा नंबर हा स्वित्झ्रलॅंडमधील हॉटेल प्रेसिडेंन्ट विल्सन हॉटेलचा येतो. इथे जवळपास एक रात्र थांबण्याचा खर्च 38 लाख रुपये येतो. या हॉटेलमध्ये 12 बेडरुम, 12 बाथरुम, हेलिपॅड, बिलियर्ड टेबल, बुलेटप्रूफ विंडो यांसारख्या सुविधा मिळतात.
3) फोर सीझन हॉटेल, न्यूयॉर्क
महागड्या हॉटेलच्या यादीत तिस-या क्रमांकावर न्यूयॉर्क शहरातील फोर सीझन हॉटेल येतं. या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी 36 लाख रुपये इतका खर्ट येतो. महत्वाची बाब म्हणजे इथे अनलिमिटेड शॅंपेन आणि मसाज उपलब्ध करुन दिली जाते. यासोबतच आणखीही सुविधा इथे दिल्या जातात.
4) द रॉयल व्हिला, ग्रीस
द रॉयल व्हिला या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी ग्राहकांना एका रात्रीसाठी 30 लाख रुपये मोजावे लागतात. या हॉटेलची खासियत म्हणजे इथे तुम्हाला प्रायव्हेट जेटने फिरवलं जातं. आणि इथे ग्राहकांना सेलिब्रिटीसारखं ट्रिट केलं जातं.
5) राज पॅलेस हॉटेल, जयपूर
देशातील सर्वात महागड्या हॉटेलबाबत सांगायचं तर हे या हॉटेलच्या शाही सुविधांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. या हॉटेलची खासियत म्हणजे येथील भींती सोन्याच्या मुलामाने आणि काचेच्या बनवण्यात आल्या आहेत. इथे एक रात्र थांबण्याचा खर्च 29 लाख रुपये इतका येतो.