लग्नाआधी बॅचलर पार्टी करण्याचा ट्रेन्ड मागील काही वर्षांपासून ट्रेन्डींगमध्ये आहे. आधी हे फक्त मुलचं सेलिब्रेट करत असत, पण आता मुलीही हळद, मेहंदीसोबत बॅचलर पार्टी सेलिब्रेट करत आहेत. जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रीणींसोबत बॅचलर ट्रिप प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भाराताच्या काही बेस्ट डेस्टिनेशन्सबाबत सांगणार आहोत. जिथे तुम्ही बॅचलर पार्टी एन्जॉय करू शकता.
तुम्ही जगभरात कुठेही जाऊन पार्टी करा, पण गोव्यामध्ये पार्टी करण्याती मजा काही औरच... भारतातील पार्टी कॅपिटल म्हणून ओळख असणारं गोवा बॅचरल पार्टी आणि बॅचलर्स लोकांचं माहेरघर आहे असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. येथे तुम्ही सुंदर बीच, एडव्हेंचर्स स्पॉर्ट्स, लेटनाइट फॅन्सी क्लबिंगसोबत क्रूज पार्टीसुद्धा एन्जॉय करू शकता. सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही येथे वर्षभरात कधीही जाऊ शकता.
नाशिक
जर तुम्ही वाइन लव्हर असाल तर हे ठिकाण खास तुमच्यासाठीच आहे. येथे तुम्ही वेगवेगळ्या वाइन्सचा आस्वाद घेऊ शकता. याव्यतिरिक्त येथे फिरण्यासाठी एकापेक्षा एक खास ठिकाणं आहेत. जर तुम्ही मार्च-जून आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लग्न करणार असाल तर ही तुमच्या बॅचलर पार्टीसाठी उत्तम ठिकाण आहे. कारण या दिवसांमध्ये येथील वातावरण अगदी अल्हाददायी असतं.
गोकर्ण
जर तुम्ही ऑक्टोबर ते मार्चमध्ये लग्न करण्याचा विचार करत असाल तर बॅचलर ट्रिपसाठी गोकर्ण उत्तम ठिकाण आहे. हे डेस्टिनेशन गोव्याप्रमाणेच आहे. जिथे तुम्ही ओम समुद्र किनारे, कुडले समुद्र, स्वर्ग समुद्र यांसारख्या सुंदर किनाऱ्यांवर पार्टीचा आनंद घेऊ शकता. डोंगरांनी वेढलल्या समुद्रकिनाऱ्यांवर तुमच्या पार्टीचा आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल.
ऋषिकेश
तुम्ही अॅडव्हेंचर्सचे शौकीन असाल तर मुला-मुलींसाठी ऋषिकेश बॅचलरेट ट्रिपसाठी बेस्ट ऑप्शन आहे. येथे तुम्ही पार्टिसोबतच कॅम्पिंग, टूरिस्ट्स योग, रिवर राफ्टिंग आणि हायकिंगचा आनंद घेऊ शकता. तसं पाहायला गेलं तर तुम्ही येथे वर्षभरात कधीही फिरण्यासाठी जाऊ शकता. पण राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठी येथे सप्टेंबरमध्ये भेट द्या.
अंदमान-निकोबार आइसलॅन्ड
जर तुम्हीही बॅचलरेट ट्रिपसाठी बीचवर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर अंदमान निकोबार तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. येथे खूप बीच आहेत, जिथे तुम्ही पार्टीचा पूरेपूर आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर येथील वॉटर स्पोर्ट्स तुमच्या ट्रिपचा आनंद आणखी वाढवतात. तसं तुम्ही येथे वर्षभरात कधीही फिरायला येऊ शकता. पण नोव्हेंबर ते मेमध्ये येथे फिरणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
पद्दुचेरी
येथील सुंदर बीच पार्टीसाठी बेस्ट ठरतात. कॉबल्ड स्ट्रीट, हेरिटेज प्रॉपर्टीज, आर्किटेक्चर, कॅफेसोबत असलेले बीच पद्दुचेरीचं प्रमुख आकर्षण आहे. याव्यतरिक्त येथील बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता. जर तुमचं लग्न ऑक्टोबर ते मार्चमध्ये होणार असेल तर येथे फिरण्यासाठी हे बेस्ट डेस्टिनेशन आहे.
अलेप्पी
अलेप्पी ते अलाप्पुझाच्या नावाने प्रसिद्ध असलेलं केरळमधील हे शहर 'पूर्वेकडील वेनिस' म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये तुम्ही वेनिसप्रमाणे तलाव, समुद्र आणि हिरवळीचा आनंद घेऊ शकता. योजनाबद्ध पद्धतीने तयार करण्यात आलेलं या शहरातील बरीच ठिकाणं तुम्ही हाउसबोटमधून फिरू शकता. येथील सनराइज आणि सनसेटचं दृश्य जगभरामध्ये फेमस आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असाल तर फिरण्याचा प्लॅन करू शकता.