नव्या वर्षात एखाद्या चांगल्या शांत आणि रोमांचक अनुभव देणाऱ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर तुम्ही हिमाचलमधील कांगडाला भेट देण्याचा प्लॅन करु शकता. इथे तुम्ही ट्रेकिंग सोबतच अॅडवेंचरची मनमुराद आनंद घेऊ शकता. चहा, तांदूळ आणि कुल्लू नावाच्या फळासाठी लोकप्रिय असलेलं हे कांगडा ठिकाण फार सुंदर आणि मोहिनी घालणारं असंच आहे. हे ठिकाण उंचच उंच डोंगरांनी घेरलं गेलं आहे. तुमच्याकडे दोन ते तीन दिवसांचा वेळ असेल तर तुम्ही इथे चांगलं एन्जॉय करु शकता.
थरारक अनुभवासाठी खास ठिकाण
काकेरी लेक ट्रॅक, बालेनी पास, लम दल, मिनकियानी पास, द्रूनी लेक, चागरोटू, इंद्राहारा पास, कॅपिंग, पॅगाग्लायडिंग, माऊंटेन बायकिंगचा तुम्ही थरारक आनंद घेऊ शकता. सोबतच येथील अंडरेट्टा गावाला भेट देऊन तुम्ही येथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
वज्रेश्वरी मंदिर
कांगडामध्ये नैसर्गिक सौंदर्य अधिक बघायला मिळतं. इथे फिरण्यासाठी वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे आहेत. फार प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरही आहे. हे मंदिर भूकंपात पूर्णपणे ढासळलं होतं. पुन्हा त्याच जागेवर हे मंदिर तयार करण्यात आलं.
नगरकोट किल्ला
प्राचीन नगरकोट किल्ला येथून २.५ किमी अंतरावर दक्षिणेला आहे. पण या किल्ल्यात आता काही बघण्यासारखं राहिलेलं नाहीये. पण याच्या आजूबाजूला अनेक सुंदर ठिकाणे आहेत. इथून मांझी-बेनर नदीचा संगम बघायला मिळतो.
मसरुर
कांगडापासून १५ किमी अंतरावर मसरुर आहे. जे अनोख्या मंदिरांसाठी ओळखलं जातं. इथे दगडांमध्ये कोरलेले १०व्या शतकातील १५ मंदिरे आहेत. हे मंदिरं अजिंठ्याच्या लेण्यांची आठवण करुन देतात. इथपर्यंत पोहोचण्याचा रस्ताही सुंदर आहे.
ज्वालामुखी मंदिर
कांगडापासून ३४ किमी अंतरावर एक कांगडा ज्वालामुखी मंदिरही आहे. हे येथील खास आखर्षण आहे.
कधी जाल?
सप्टेंबर महिना इथे येण्यासाठी परफेक्ट कालावधी मानला जातो. कारण यावेळी येथील तापमान २२-३० डिग्री असतं. म्हणजे गरमीही नसते आणि जास्त थंडीही नसते. ट्रेकिंगसाठी मे ते जूनचा कालावधी योग्य मानला जातो.
कुठे थांबाल?
कांगडामध्ये राहण्यासाठी तुम्हाला स्वस्त आणि चांगले पर्याय मिळतात. कॅम्पपासून ते हॉटेस्ल, गेस्ट हाऊसपर्यंत इथे सगळंच आहे.
कसे जाल?
रस्ते मार्ग - दिल्ली, शिमला, मनाली, चंडीगढ येथून कांगडासाठी सतत बसेस असतात.
रेल्वे मार्ग - इथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळील रेल्वे स्टेशन पठाणकोटला आहे. हे कांगडापासून ९४ किमी अंतरावर आहे. स्टेशनहून टॅक्सी किंवा बसेसने कांगडाला पोहोचू शकता.