सुट्ट्यांमध्ये फिरायला जाताना पर्यटक नेहमीच त्यांना शहरातील धावपळीतून शांतता मिळावी आणि अॅडवेंचरस काहीतरी करता यासाठी खास ठिकाणांचा शोध घेत असतात. पोनमुडी हिल स्टेशन अशाच काही खास जागांपैकी एक आहे. पावसाळ्यानंतर येथील नैसर्गिक सुंदरता आणखीनच बहरलेली असते. इथे तुम्हाला शांतता तर मिळेलच सोबतच तुम्ही अनेक रोमांचक गोष्टीही करु शकता. चला जाणून घेऊ तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पोनमुडी हिल स्टेशनची खासियत...
पोनमुडी हिल स्टेशन
पावसाळा संपल्यावर पोनमुडीत पर्यटकांनी चांगलीच वर्दळ बघायला मिळते. पूर्णपणे जंगलाने वेढलेल्या या ठिकाणी पशु-पक्ष्यांच्या २८० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. अनेक दुर्मिळ पक्षी येथील जंगलात बघायला मिळतात. हे पक्षी बघण्यासाठी पोनमुडीमध्ये परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात.
मीनमुट्टी प्रपात
दाट जंगलातून पायी प्रवास करत तुम्ही मीनमुट्टी वॉटर फॉलला पोहोचू शकता. हा वॉटर फॉल स्वच्छ पाण्यासाठी चांगलाच लोकप्रिय आहे. निसर्गाच्या सानिध्यात फिरणे, पशु-पक्ष्यांची किलबिल ऐकणे हा तुम्हाला आनंद देणारा वेगळा अनुभव नक्कीच ठरु शकतो.
अगस्यारकूडम
पोनमुडीमध्ये पश्चिमी घाटातील सर्वात उंच डोंगर अगस्त्यारकूडम आहे. हा डोंगर चारही बाजूंनी जंगलाने वेढलेला आहे. गोल्डन पीक आणि गोल्डन व्हॅली याला ड्रिम टाऊन बनवण्याचं काम करतात. ट्रेकिंगसोबतच कल्लर नदीच्या खाली उतरत्या झऱ्याला बघणे कधीही न विसरता येण्यासारखं ठरेल.
कोवलम बीच
पोनमु़डीच्या या बीचवर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबतही क्वॉलिटी टाईम स्पेंड करु शकता. त्यासोबतच बीचच्या आजूबाजूला फिरण्यासाठीही अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
थेनमाला
नाईट ट्रिप किंवा फॅमिलीसोबत आउटिंग करण्यासाठी तुम्ही थेनमालामध्ये रात्र घालवू शकता. रात्रीच्यावेळी येथील नजारा बघण्यासारखा असतो.
कसे पोहोचाल?
जर तुम्हाला रेल्वेने जायचे असेल तर तिरुवनंतपुरम रेल्वे स्टेशनला उतरावं लागेल. तेथून ६१ किमी अंतरावर असलेल्या पोनमुडीसाठी टॅक्सी, बसेस आणि ऑटो सुरु असतात. तेच जर विमानाने जाणार असाल तर तुम्हाला तिरुवंतपुरम एअरपोर्टला उतरुन पुढे टॅक्सी किंवा बसने जावं लागेल.