नवनवीन ठिकाणी फिरायला गेल्याने मनाला शांती लाभते. धकाधकीच्या जीवनातून थोडावेळ असा मोकळ्या ठिकाणांवर वेळ घालवल्यास आपला मूडही फ्रेश आणि आनंदी राहण्यास मदत होते. आपल्या देशातील काही ठिकाणे अशी आहेत की, त्या ठिकाणी फिरण्याची मज्जा काही औरच आहे. अशाच काही खास ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. जाणून घेऊयात या ठिकाणांची माहिती...
1. सोलंग -
हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये सोलंग हे गाव वसलेले आहे. 300 मीटर उंचीवर वसलेले हे गाव प्रसिद्ध आणि नामांकित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या गावाला स्नो पॉईंट म्हणून देखील ओळखले जाते. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सोलंगने पांढरीशुभ्र बर्फाची चादर पांघरलेली असते. ज्या लोकांना अॅडव्हेंचर्स, ट्रेकिंग करण्याची आवड आहे. त्यांच्यासाठी सोलंग हा उत्तम पर्याय आहे.
2. कसोल -
जर तुम्हाला कॅम्पिंग आणि ट्रेकिंगची आवड असेल तर अजिबात उशीर न करता कसोलला जाण्याची तयारी करा. कसोल आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. कसोल खीरगंगा ट्रेक, मलना ट्रेक, तोष गाव आणि रिव्हर पर्वती फिरण्यासाठी बेस्ट ऑपशन्स आहेत.
3. औली -
हिमालयाच्या कुशीत वसलेले औली हे कदाचितच कोणाला ठाऊक असेल. थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देत असतात. औली हिमालयातील पर्वत रांगांमध्ये स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी येथे जाण्यासाठी योग्य काळ मानला जातो. इथे 3 किलोमीटर लांब आणि 500 मीटर लांब स्की लिफ्ट आहे. तसेच इथे अनेक स्की रिसॉर्टदेखील आहेत.
4. मेघालय -
जर तुम्हाला हिरवळ, डोंगर, झरे आकर्षित करतात तर तुम्ही मेघालयाला नक्कीच भेट दिली पाहिजे. इथे फिरण्यासाठी खुप अॅडव्हेंचर्सस स्पॉट आहेत. इथे सेवन सिस्टर फॉल, उमियम लेक, स्प्रेड ईगल फॉल, एलिफंट लेक, शिलाँग व्हूव पॉईंट, गारो हिल्स आणि खासी हिल्स यांसारखी ठिकाणं आहेत. येथील निसर्गसौंदर्यासोबतच येथील संस्कृतीही आपल्याला आकर्षित करते.
5. कुर्ग -
पर्यटकांना फिरण्यासाठी कुर्ग हा एक उत्तम पर्याय आहे. कुर्गचे अब्बे फॉल, बेरा फॉल रिव्हर, नल्कनाद पॅलेस, ब्रह्मागिरी पीक, नामद्रोलिंग मोनेस्टरी, इरुप्पु फॉल आणि कावेरी रिव्हर सारखे अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
6. सिक्किम -
उत्तर भारतातील सर्वात सुंदर स्थळांमध्ये सिक्कीमचा उल्लेख करण्यात येतो. येथील निसर्गसौंदर्य स्वर्गाहूनही सुंदर असल्याचे म्हटले जाते. सिक्कीममध्ये फिरण्यासाठी अनेत सुंदर आणि मन प्रसन्न करणारी ठिकाणे आहेत.
7. लदाख -
सिंधु नदीच्या काठी वसलेले लदाख हे शहर जम्मू आणि कश्मीर राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. याला लिटिल तिबेट, मून लॅन्ड आणि ब्रोकन मून म्हणून संबोधले जाते. लदाखमधील जंस्कार व्हॅली, खरदुंग -ला- पास, हेमिस नॅशनल पार्क आणि स्पीतुक गोम्पा ही ठिकाणे फिरण्यासाठी उत्तम आहेत.