सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच मनाला शांतताही हवीये? 'या' खास ठिकाणाला भेट देऊन करा मजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:46 AM2019-05-28T11:46:37+5:302019-05-28T11:56:06+5:30

तुम्हीही फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. या ठिकाणी काही दिवस फिरायला जाऊन तुम्ही सुट्टी एन्जॉय करू शकता. 

Chakrata in Uttarakhand a beautiful and pleasant place | सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच मनाला शांतताही हवीये? 'या' खास ठिकाणाला भेट देऊन करा मजा!

सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच मनाला शांतताही हवीये? 'या' खास ठिकाणाला भेट देऊन करा मजा!

Next

सततचं काम, आग ओकणारा उन्हाळा यातून जरा मोकळा वेळ कुठे घालवायचा असेल तर अर्थातच मनाला शांतता मिळेल असंच ठिकाण हवं असेल. तुम्हीही फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. या ठिकाणी काही दिवस फिरायला जाऊन तुम्ही सुट्टी एन्जॉय करू शकता. 

उत्तराखंड, हिमाचल आणि राजस्थानमध्ये जास्तीत जास्त पर्यटक येतात. पण अनेक ठिकाणी गर्दी असल्याने शांतता मिळत नाही. त्यामुळे उत्तराखंडमधील अशा एका ठिकाणाची माहिती आम्ही देणार आहोत, जिथे तुम्हाला शांतताही मिळेल आणि या ठिकाणाची सुंदरताही तुम्हाला आवडेल. इथे पर्यटकांची फार गर्दी नसते. या ठिकाणाचं नाव आहे चकराता.

(Image Credit : commons.wikimedia.org)

चकराता हिल स्टेशन हे देहरादूनपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. उंच डोंगर, घनदाट जंगल आणि सुंदर नजारे या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. असे लोकेशन तुम्हाला इतर कुठेही बघायला मिळणार नाहीत. इथे तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता.

काय आहे खासियत

(Image Credit : BCMTouring)

चकरातामध्ये फिरण्यासाठी देव वन, टायगर हिल्स, लाख मंडल, राताल गार्डन हे खास लोकेशन्स आहेत. येथून काही अंतरावरच बुढेरच्या गुहा आहेत. तसेच तुम्ही इथे लोकल मार्केटमध्ये शॉपिंगचाही आनंद घेऊ शकता.

पिकनिकसाठी खास स्पॉट

(Image Credit : Justdial)

जर तुम्हाला कोणत्याही एकाच ठिकाणी थांबून पिकनिकचा आनंद घ्यायचा असेल तर लाख मंडल किंवा रामताल गार्डनमध्ये जाऊ शकतो. लाख मंडल या ठिकाणी वनवासादरम्यान पांडव येऊन राहिले होते, असे मानले जाते.

बुढेर गुहा

(Image Credit : TripAdvisor)

चकरातापासून ३० किमोमीटर दूर बुढेर गुहा आहेत. या गुहांना मिओला केव्ह्स असंही म्हटलं जातं. अॅडव्हेंचरची आवड असणारे लोक १५० मीटर लांब या गुहेत फिरून वेगळा अनुभव घेऊ शकता. या गुहा मुख्यत्वे चूना आणि दगडांपासून तयार केल्या आहेत.

स्टार गेजिंग

(Image Credit : Shoes On Loose)

चकराता स्टार गेजिंगसाठी प्रसिद्ध आहे. शहरातील प्रदूषण आणि उंचच उंच इमारतींमधील रोषणाईमुळे अनेकदा आकाशातील तारे बघायला मिळत नाहीत. पण जर तुम्हाला खूल्या आकाशाखाली ताऱ्यांसोबत रात्र घालवायची असेल तर चकरातामध्ये एकदा जायला हवं.

Web Title: Chakrata in Uttarakhand a beautiful and pleasant place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.