जर तुम्हाला बाईक रायडिंगची आवड असेल आणि तुम्ही कधीकधी खतरों के खिलाडी होत असाल तर, तुम्ही एकदा तरी चूलगिरीला भेट द्यावी. चूलगिरीला बाइक रायडिंगचा अनुभव नक्कीच रोमांचक ठरेल. डोंगरांमधील रस्त्यांमध्ये बाइक चालवण्याचा अनुभव अत्यंत सुंदर असेल. त्यानंतर डोंगरावर पोहोचल्यानंतर शांत आणि सुंदर वातावरणामध्ये असलेलं जैन मंदिर पाहता येईल. या ठिकाणी फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी अनेक लोक पोहोचतात.
चूलगिरी येथे असलेलं एक दिगंबर जैन मंदिर असून ते आपल्या वेगळ्या वास्तूकलेसाठी ओळखलं जातं. येथे भगवान महावीरांची 21 फुटांची उंच प्रतिमा स्थापन केलेली आहे. परत्येक वर्षी मे महिन्यामध्ये येथे वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात येते. मंदिराचे दर्शन तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेऊ शकता. लश्रात ठेवा, येथील रस्ता डोंगराळ असून जंगलाने वेढलेला असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळनंतर येथे जाण्याची परवानगी नाही.
जर बाईक राइड करायची नसेल तर,
जयपूर शहरापासून चूलगिरीला पोहोचण्यासाठी तुम्हाला घाटातील गुणी सुरंगच्या माध्यमातून सफर करावं लागेल. येथून अगदी आरामात तुम्ही चूलगिरीला पोहोचू शकता. कारण हे ठिकाण शहराच्या बाहेरील भागामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला गरज असेल तर येथे पोहोचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टची मदत घेऊ शकता. परंतु येथे तुम्हाला डोंगरांमधील रस्त्यांवर तयार करण्यात आलेल्या रोडवरून प्रवास करावा लागेल. तुम्ही गरज असल्यास पायऱ्यांचाही वापर करू शकता. परंतु डोंगरावर असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जवळपास एक हजार पायऱ्या चढाव्या लागतील.
कसे पोहोचाल चूलगिरी?
चूलगिरीच्या डोंगररांगा जयपूर-आग्रा रोड म्हणजेच, एनएच-11 वर स्थित आहे. जर तुम्ही जयपूरमध्य फिरण्याचा प्लॅन करत असाल तर चूलगिरीलाही नक्की भेट द्या. किल्ले, महालांपेक्षाही वेगळं रायडिंग आणि रोमांचंक ट्रिपचा अनुभव अजिबात मिस करू नका. या डोंगररांमधील रस्ते पार करणं जेवढं रोमांचकारी आहे, तेवढेच भारी येथील डेस्टिनेशन्स आहेत. जयपूरच्या सिंधी कॅम्प बस स्टॉपपासून चूलगिरी जवळपास 12 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण जवळपास 15 किलोमीटर आणि जयपूरच्या सांगानेर एअरपोर्टपासून चूलगिरी जवळपास 18 किलोमीटर आहे.