विमानतळावर सामान हरवू शकतं. ते परत मिळवण्यासाठी या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 06:41 PM2017-11-01T18:41:17+5:302017-11-01T18:50:31+5:30

विमानतळावर सामान हरवलं तर आता काय? असा हतबल करणारा प्रश्न पडतो. पण सामान हरवल्यानंतर काय करायचं हे जर पक्कं माहित असेल तर गहाळ झालेलं सामान विनाकटकट मिळतंही.

Do these five things immediate if you lost your baggage at airport | विमानतळावर सामान हरवू शकतं. ते परत मिळवण्यासाठी या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

विमानतळावर सामान हरवू शकतं. ते परत मिळवण्यासाठी या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

ठळक मुद्दे* सामानासंबधीची माहिती घेण्यासाठी एअरलाइन तुमच्याकडून प्रॉपर्टी इररेग्युलॅरिटी रिपोर्ट फॉर्म अर्थात पीआयआर भरु न घेते. जर तुम्हाला तुमच्या हरवलेल्या सामानाची नुकसानभरपाई हवी असेल तर तुम्ही संबंधित विमान कंपनीला तसं लेखी कळवणं गरजेचं आहे.* एअरलाइन्स सामानासंबंधीची आपली जबाबदारी टाळत नाहीत. त्यामुळे नि:संकोचपणे एअरलाइन्सच्या सेंट्रल डिपार्टमेंटला किंवा एअरपोर्टवरच्या बॅगेज सर्व्हिसेसना सांगून तुम्ही सामानाच्या ट्रेसिंगला सुरूवात करु शकता.* तुमचा प्रवास परतीचा नसेल आणि तुमचं सामान हरवलंय, तुमच्याजवळ आता कपडे किंवा गरजेच्या इतर वस्तू नाहीयेत. अशा परिस्थितीत संबंधित विमानकंपनीनं तुम्हाला मूलभूत गोष्टी, कपडे यासाठीची नुकसानभरपाई देणं बंधनकारक आहे. 


- अमृता कदम


तुम्ही विमानतळावर तुमच्या सामानाची वाट पाहात बेल्टपाशी उभे आहात. पण सामान काही येतच नाहीये. तुमचा धीर हळूहळू सुटतो आणि मग आपलं सामान गहाळ झालंय हे जाणवतं. अशावेळी  ‘आता काय करायचं ’ अशी  हतबल प्रतिक्रि या येणं स्वाभाविकच आहे. पण हातपाय गाळून काही होत नाही. विमानतळावर गहाळ झालेलं, हरवलेलं आपलं सामान परत कसं मिळवायचं हे माहित असणंही तितकंच गरजेचं आहे. 

 



विमानतळावर सामान हरवल्यास

1. तत्परतेनं हालचाली करा
सामान हरवल्यानंतर नुसतंच भांबावून जाण्यापेक्षा सामान परत मिळवण्यासाठी तातडीनं हालचाली करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या एअरलाइननं प्रवास करत आहात, त्यांच्या डेस्कवर जाऊन तुम्ही तुमचं सामान गहाळ झाल्याची माहिती आधी द्या. एअरलाइन्स सामानासंबंधीची आपली जबाबदारी टाळत नाहीत. त्यामुळे नि:संकोचपणे एअरलाइन्सच्या सेंट्रल डिपार्टमेंटला किंवा एअरपोर्टवरच्या बॅगेज सर्व्हिसेसना सांगून तुम्ही सामानाच्या ट्रेसिंगला सुरूवात करु शकता. तुम्ही आॅनलाइन बॅगेज ट्रेसिंग पेजवर लॉग इन करूनही आपल्या सामानाची माहिती घेण्याचा प्रयत्न करु शकता. त्यासाठी तुमच्या लगेज रिसिटवरचा रेफरन्स नंबर तुम्हाला द्यावा लागतो.

2. प्रॉपर्टी इररेग्युलॅरिटी रिपोर्ट फॉर्म
सामानासंबधीची माहिती घेण्यासाठी एअरलाइन तुमच्याकडून प्रॉपर्टी इररेग्युलॅरिटी रिपोर्ट फॉर्म अर्थात पीआयआर भरु न घेते. जर तुम्हाला तुमच्या हरवलेल्या सामानाची नुकसानभरपाई हवी असेल तर तुम्ही संबंधित विमान कंपनीला तसं लेखी कळवणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमच्या पीआयआर फॉर्मची एक प्रतही तुम्हाला जोडावी लागते. अर्थात, ही प्रक्रि या तुम्ही प्रवास करत असलेल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत पूर्ण करणं गरजेचं आहे.

3.सामानासंबंधीच्या बारीकसारीक गोष्टीही लक्षात ठेवा
तुम्हाला वैयक्तिक आणि फ्लाइटसंबंधीच्या माहितीबरोबरच तुमच्या सामानाचं अचूक वर्णन करता येणंही गरजेचं आहे. एअरलाइन स्टाफला तुम्ही तुमची बॅग आणि सामान यांचा बारीकसारीक तपशील पुरवू शकला तर तुमचं काम सोपं होऊन जातं. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासाला निघण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या बॅगेचे आणि सामानाचे एक दोन फोटो काढून ठेवलेले चांगलं. हा पुरावा जास्त ग्राह्यही मानला जातो.

 



4. आपलं सामान हरवलं आहे याची लेखी तक्रार तुमच्या प्रवासाच्या तारखेच्या सात दिवसांमध्येच करणं गरजेचं असतं.

5. तुमचा प्रवास परतीचा नसेल आणि तुमचं सामान हरवलंय, तुमच्याजवळ आता कपडे किंवा गरजेच्या इतर वस्तू नाहीयेत. अशा परिस्थितीत संबंधित विमानकंपनीनं तुम्हाला मूलभूत गोष्टी, कपडे यासाठीची नुकसानभरपाई देणं बंधनकारक आहे. समजा तुम्ही प्रवास दोन वेगवेगळ्या विमानकंपन्यांसोबत करत असाल तर सामान परत मिळवण्यासाठी थोडाफार त्रास होऊ शकतो. अशावेळी तुमचं सामान तुम्ही ज्या कंपनीच्या विमानानं शेवटचा प्रवास केलाय त्यांच्याकडे क्लेम करणं केव्हाही चांगलं.
तुम्ही तुमच्या सामानासंबंधीची माहिती आणि पावत्या दिल्यानंतर तुम्हाला तुमची नुकसानभरपाई रोखीनं दिली जाते.
प्रवासात आपण आपल्या सामानाची काळजी घेतच असतो. पण तरीही कोणत्याही कारणानं सामान हरवलंच तर काय करायचंय हे माहित असलेलं चांगलं. खबरदारी घेतलेली कधीही फायद्याचीच ठरते.

 

 

 

Web Title: Do these five things immediate if you lost your baggage at airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.